भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई
भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई
भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई
भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई
भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई
भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई

पुणे, (प्रबोधन न्यूज) - भारती विद्यापीठ परिसरात अतिक्रमण विभागाने कारवाई करून या भागातील अनधिकृत स्टॉल, हातगाड्या, हॉटेलच्या पुढील शेड, पदपथावरील स्टॉल, साइड मार्जिनाला असलेल्या व वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या शेड काढून टाकल्या. या कारवाईत विद्यापीठ परिसर, त्रिमूर्ती, काश्मीर मैत्री, चंद्राभाग, सरहद चौक व कात्रज डेअरी, दत्तनगर भुयारी मार्ग तसेच भारती विद्यापीठ समोरील भारती विहार, पतंग प्लाझा सोसायटी समोरील दुकानांसमोर व बाजूस असलेले पत्र्यांचे शेड काढण्यात आले.

दोन दिवस आधी या सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. महापालिकाचे पंधरा बिगारी, दोन जेसीबी सहाय्याने अकरा हजार स्क्केअर फूट अतिक्रमण हटविण्यात आले. ह्यामध्ये 12 स्टॉल, दोन फ्रीज, टेम्पो व इतर वस्तू जप्त केले. बांधकाम विभाग, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्ता संध्या गांगरे, बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता नाथा चव्हाण, बांधकाम निरिक्षक उमेश शिद्रुक, अतिक्रमण निरीक्षक शशिकांत टाक,किरण कलशेट्टी यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त कारवाई पार पाडली.

या कारवाईत 80 मजूर कर्मचारी, 6 जेसीबी, 12 डम्पर, 2 गॅस कटर यांच्यासह 2 पोलिस निरीक्षक, 40 पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तसेच वॉर्ड अतिक्रमण विभाग कर्मचारी, यांच्या मदतीने केली. या कारवाईसाठी नोटीस देऊनही अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे या भागामध्ये अनेक दुकानदारांनी तात्पुरते उभे केलेल्या शेडपत्रे, खुर्च्या-टेबल जप्त केले, दोन वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे, अशी माहिती शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे यांनी दिली.