पुण्यातील भवानी पेठेत झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला? गूढ वाढलं

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यातील भवानी पेठेत झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला? गूढ वाढलं

पुणे, (प्रबोधन न्यूज) - पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये स्फोट झालाय. विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रशाद मोहम्मद अली शेख असं आहे. रशादकडे चौकशी केल्यानंतर तो कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत लिशा इनकलेव या सोसायटीमध्ये राहत असल्याचं कळाल्यानंतर पुणे पोलीस तिथेही पोहोचले आणि आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली.

भवानी पेठेतील या स्फोटमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे अनेक सिमकार्ड आणि पासपोर्ट आढळलेले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो या पासपोर्टचा वापर करून अनेक देशात गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा स्फोट कशाचा झाला याचा तपास सुरू आहे. हा स्फोट नेमका वॉशिंग मशीनचा आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुणे पोलीस अजूनही काही बोलायला तयार नसल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललं आहे.

रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेअरींगची कामे करतो. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचं समोर आलं होतं. शेख हा गेल्या 10 वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली. राशद हा मुळचा मुंबईतला आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. मात्र तो गेल्या 10 वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये राहतो आहे.