विधान परिषद निवडणुकीनंतर सरकार कोसळणार ? प्रसाद लाड यांचा दावा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विधान परिषद निवडणुकीनंतर सरकार कोसळणार ? प्रसाद लाड यांचा दावा

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपने विधानपरिषदेसाठीही फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपने आपले ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. या सहाही जागा भाजप जिंकेल, सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपकडे असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

राज्यसभेप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेसाठीही जोरदार तयारी केली आहे. त्यांनी रणनिती आखून ४ उमेदवारांचा कोटा असतानाही ५ व्या उमेदवाराचं आव्हान मविआपुढे ठेवलं आहे. त्यामुळे फडणवीसांचा काहीतरी मोठा प्लान असल्याचं चित्र आहे. त्यातच आता प्रसाद लाड यांनीही सहाही जागा जिंकण्याची ताकद भाजपकडे आहे, असं म्हटलं आहे.

भाजपचे संख्याबळ १०६ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी १०८ मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी २७ मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा जास्त मतांची गरज लागेल.

मात्र, यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्याची किमया घडवल्यास तो ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का ठरेल. कारण, सहाव्या जागेसाठी भाजपला किमान १५० तरी मते लागतील. राज्यात सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर अर्थात बहुमताचा आकडा हा १४४ इतका आहे. त्यामुळे विधानपरिषेदत सहावी जागा निवडून आणल्यास भाजप आपोआपच बहुमताचा आकडा गाठेल आणि महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येईल.