अब्दुल सत्तारांनी आम्हाला खूप मदत केली; दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अब्दुल सत्तारांनी आम्हाला खूप मदत केली; दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी  राज्यसभेच्या निवडणुकीत मदत केल्याबद्दल सत्तारांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही कराली असे संतोष दानवे म्हणाले आहेत. आता भाजपच्या एका आमदराने शिवसेनेच्या बड्या नेत्याने आम्हाला मदत केली म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाले आहे.

दरम्यान अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकी अगोदर याच संतोष दानवेंबद्दल एक वक्तव्य केले होते. अब्दुल सत्तार म्हणाले होते की संतोष दानवे यांचे मत आमच्या घरातील आहे, ते मी फोडणारच. आमचं सर्व बोलणं झाले आहे त्यामुळे दानवे शिवसेनेला मतदान करतील असेही सत्तार म्हणाले होते. परंतु आता संतोष दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नक्की काय झाले असेल असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.