केंद्र सरकारचे काउंटडाऊन सुरू : डॉ. कैलास कदम (video)

खा. राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द म्हणजे लोकशाहीचाकाळा दिवस आणि हुकूमशाही कडे वाटचाल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केंद्र सरकारचे काउंटडाऊन सुरू : डॉ. कैलास कदम (video)

पिंपरी - केंद्र सरकारने खा. राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ पिंपरीत काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलनकेंद्र सरकारने खा. राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ पिंपरीत काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले  करण्यात आले. यावेळी पहिले लढते गौरसे अब लडेंगे चोरो से अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला

यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनीही केंद्र सरकारचा निषेध करणारे भाषण केले. ज्येष्ठ नेते गौतम अरकडे, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ, भाऊसाहेब मुगुटमल, डॉ. मनीषा गरुड, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बाबासाहेब बनसोडे, मिलिंद फडतरे, जेव्हीयर ॲन्थोनी, निखिल भोईर, आण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, अमर नाणेकर, लक्ष्मण रुपनर, अबुबकर लांडगे, भास्कर वानखेडे, हरिष डोळस, हिरा जाधव, दहर मुजावर, फिरोज तांबोळी, किरण नढे, दिपक भंडारी, आकाश शिंदे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा दिवस भारतीय लोकशाहीचा काळा दिवस म्हणून गणला जाईल. काँग्रेस पक्ष हा देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बलिदान देऊन सक्षमपणे उभा असलेला पक्ष आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करून कायदा मानणारा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे. खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व दाबण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. संसदेत केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी बेकायदेशीर रित्या सरकारने राहुल गांधी यांचे खासदार पद संपुष्टात आणले आहे. वस्तूता सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत दिली असताना देखील केंद्र सरकारने खा. राहुल गांधी यांची खासदारकी तडका फडकी रद्द केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते विचलित होणार नाहीत, तर उलट केंद्र सरकारने शेतकरी, कामगार, बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण, भांडवलदारांना पाठबळ या विषयी घेतलेले चुकीचे निर्णय उघडकीस आणून घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करतील. भांडवलदार धार्जिन या

सरकारचे आता काउंट डाऊन सुरू झाले असून देशात लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही ची सुरुवात होण्याचे हे लक्षण आहे. केंद्र सरकारने ताबडतोब खा. राहुल गांधी यांच्या खासदारकी विषयी घेतलेला निर्णय रद्द करावा अन्यथा काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावर उतरून जाब विचारेल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी येथे दिला.

https://youtu.be/IEXQcUF4BIk