उमा खापरे पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार ठरणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलले
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप या निवडणुकीत पाच जागा लढवणार आहे. भाजपने राज्यातील दिग्गजांना डावलत दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पाच उमेदवारांपैकी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नवीन चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे.
भाजपने महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिल्या आमदार होण्याचा मान खापरे यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शहराला पहिल्यांदाच विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विधानपरिषदेवर निवडून येणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत खापरे यांचे नाव चौथ्या नंबरवर आहे. त्यामुळे त्या आमदार होणार हे निश्चित आहे. शहराला चौथा आणि शहर भाजपला तीसरा आमदार मिळणार आहे.
उमा खापरे यांच्या विषयी माहिती जाणून घेऊयात
उमा खापरे या भाजपच्या निष्ठावान आणि जुन्या पिढीतील कार्यकर्त्या आहेत. त्या सोनार समाजातून येतात. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष. महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह विविध पद भूषवली. भाजपच्या निष्ठावंत आणि जुन्या नेत्या म्हणून त्यांची ओळख. 1997 ते 2007 महानगर पालिका नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 1998 ते 2001 कोषाध्यक्ष. 2001 ते 2003 त्या महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. 2000 ते 2002 भाजप महिला मोर्चा सचिव. 2002 ते 20011 तीन टर्म भाजप महिला मोर्चा सरचिटणीस. 2017 ते 2020 सोलापूर च्या प्रभारी. 2019 ते 2022 महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे.
पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र भाजपाने उमा खापरे यांच्या रुपाने नव्या चेहऱ्याला संधी देत एकप्रकारे दिग्गज नेत्यांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे.