यंदाची आषाढी वारी करोना निर्बंधमुक्त; 15 लाख भाविक पंढरपुरात येणार?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) - दोन वर्षांपासून वारीत खंड पडल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात तब्बल पंधरा लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
विधान भवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.
पत्रकार परिषदेनंतर बोलताना अजित पवार म्हणाले, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या प्रस्थानचे नियोजन करण्यात आले आहे. वारीची सर्व तयारी सुद्धा झाली आहे. यापूर्वी दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे निर्बंध होते, त्यामुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही. मात्र यंदा कोणतेही निर्बंध नाही त्यामुळे पालखी सोहळ्यात जवळपास पंधरा लाख भाविक जमतील. यावेळी पालखी मार्गावर कोण कोणत्या सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याची माहिती सु्द्धा अजित पवार यांनी यावेळी दिली.