वसंत मोरेंच्या एका पोस्टमुळे ‘त्या’च्या खात्यात 24 तासांत 5 लाख रुपये जमा झाले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची. हा आहे कै. सोनेरी आमदार रमेशभाऊंचा अंगरक्षक श्री. उमेश रमेश वसवे, राहणार सिंहगड वसवेवाडी, वय अवघे 40, उंची तब्बल 7 फूट, वजन 165 किलो अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या 2 वर्षांपासून आजाराने व्यापलाय. होतं नव्हतं ते सगळे जगण्याच्या धडपडीत गमावून बसलाय. लोकांना सुरक्षा देणारा खली आज जगण्यासाठी ढसाढसा रडताना पाहिलाय.
पुण्यातील एका नामांकित बिल्डरने त्याचे कष्टाचे पैसे बुडवलेत. मी त्या बिल्डरला फोन केला तर पैसे नाहीत बोलला. ठीक त्याला थोडा सवडीने बघतो. पण मित्रांनो हा उमेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे जर त्याने या महिन्यात त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित ही आपली मराठी माणसाची संपत्ती मातीत मिळेल. त्याचे नाशिकला ऑपरेशन करायचे आहे.
तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे उमेशला जमेल तशी यथाशक्ती मदत करा. तुमचे 100 ते 500 रु. सुद्धा हा धिप्पाड मराठी देह वाचवू शकतात, कारण ही असली माणसं परत परत जन्म घेत नाही. तेव्हा प्लीज... त्याचा गुगल पे नंबर आहे 8484844343 वर मदत करा...
अशी पोस्ट केली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रांड वसंत मोरे यांनी. वसंत मोरे यांच्या या आवाहनानंतर चमत्कार झाला. ज्या माणसाच्या खात्यात अवघे सहा हजार रुपये शिल्लक होते त्याच माणसाच्या बँक खात्यात अवघ्या 24 तासानंतर तब्बल पाच लाख रुपये जमा झाले आहेत. हे सर्व शक्य झाले ते वसंत मोरे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे. ही मदत जमा झाल्यानंतर वसंत मोरे यांनी मदत करणार यांचे आभारही मानले आहेत.