युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेहाबाबत भाजप आमदाराची असंवेदनशीलता !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बेंगळुरू, दि. 4 मार्च - युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त आणि अत्यंत असंवेदनशील विधान केले आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार अरविंद बेलाड यांनी युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 'एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात.'
'विमानात मृतदेह आणण्यासाठी जास्त जागा लागते. मृतदेहासाठी लागणाऱ्या जागेत दहा लोक बसू शकतात आणि ते परत आणता येतात,' असे वक्तव्य बेलाड यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवीनचा मृतदेह युक्रेनमधून परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र त्या देशात युद्ध सुरू आहे, अशा परिस्थितीत त्या लोकांना जिवंत आणणे आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे.
भाजपा आमदाराचे हे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विधानानंतर आली आहे. जेव्हा वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणारे ९० टक्के विद्यार्थी भारतीय प्रवेश परीक्षा पास करू शकत नाहीत, असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले होते. मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
बेलाड हे उत्तर कर्नाटकातील भाजपा नेते आहेत. युक्रेनमध्ये मृत्यू झालेला नवीन हा भारतीय विद्यार्थीही याच भागातील आहे. 'शासकीय बाजूने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. पण तिथे युद्ध सुरू आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील आणि शक्य झाल्यास मृतदेह परत आणला जाईल. जे जिवंत आहेत त्यांना आणणे अवघड आहे. त्यामुळे मृतदेह परत आणणे आणखी कठीण आहे. विमानामध्ये मृतदेह आणण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते. मृतदेहासाठी आवश्यक असलेल्या जागेत दहा जणांना बसवून परत आणता येईल,'असे बेलाड यांनी म्हटले आहे.