महात्मा फुले वाड्यावर थेट नगरसेविकेच्या सासूचे नाव; भाजप नगरसेविकेचा प्रताप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महात्मा फुले वाड्यावर थेट नगरसेविकेच्या सासूचे नाव; भाजप नगरसेविकेचा प्रताप

पुणे, दि. 28 मे - नगरसेवकांनी संकल्पनेच्या नावाखाली चमकोगिरी सुरू केली असताना आता तर थेट कहरच केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविकाने ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर स्वतःच्या सासूच्या नावाचा फलक लावल्याची धक्कदायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. हा फलक २४ मे रोजी लावला असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच सॅलिसबरी पार्कला स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या परिजनाचे नाव दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर भाजपच्या एका माजी नगरसेविकेने या सगळ्याचा कळसच गाठला.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची १४ मार्च रोजी मुदत संपली मात्र असे असले तरी स्वतःच्या नावाने बोर्ड लावण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यातच आता भाजपच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हिरहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक ऐतिहासीक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव आहे. नगरसेविकेच्या सासूचे नाव फुले वाड्यावर लावण्यात आल्याने त्यावर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.

तर महात्मा फुले मंडळचे अध्यक्ष मधुकर राऊत म्हणाले की, महात्मा फुले वाडा येथे लक्ष्मीबाई हरिहर यांच्या नावाचा फलक लावण्याची काहीच गरज नव्हती हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. नगरसेवकांनी मुदत उलटून गेल्यानंतर ऐतिहासिक वाड्यावर बोर्ड लावला. हा एक प्रकारचा विद्रूपीकरण व महात्मा फुले यांचा अपमान आहे. हा फलक व नावे त्वरीत काढून टाकावीत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

तर या संपूर्ण प्रकरणावर नगरसेविकेचे पती मोतीलाल हरिहर म्हणाले की, वाड्याच्या कमानीवर माझ्या आईच्या नावाचे फलक लावण्याचा निर्णय महापालिकेच्या नाव समितीमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आहे. यात आमचा कौटूंबीक सहभाग आहे. यास कोणाचा विरोध असेल तर फलक काढण्याबाबत पुढचे पुढे बघू.

या सगळ्या प्रकारानंतर समता परिषद आणि अन्य संघटना प्रचंड आक्रमक झाल्या. या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून फुले वाड्याच्या परिसरात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.महात्मा फुले वाडा येथे लक्ष्मीबाई हरिहर यांच्या नावाचा फलक लावण्याची काहीच गरज नव्हती हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. नगरसेवकांनी मुदत उलटून गेल्यानंतर ऐतिहासिक वाड्यावर बोर्ड लावला. हा एक प्रकारचा विद्रूपीकरण व महात्मा फुले यांचा अपमान आहे. हा फलक व नावे त्वरीत काढून टाकावीत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा महात्मा फुले मंडळचे अध्यक्ष मधुकर राऊत यांनी दिला.