राज्य सरकार मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवीत आहे ! देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - कोरोनाचं भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच आभासी चित्रं निर्माण करणंही परवडणार नाही, असं सांगतानाच मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जात आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कोरोना परिस्थितीचं विदारक चित्रं मांडतानाच अनेक मुद्द्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्षही वेधलं आहे. कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
पत्रात आठ दिवसांची आकडेवारीच दिली
गेल्यावर्षी कोरोनाच्या कमी चाचण्या होत होत्या. त्यावेळी मी तुम्हाला पत्र लिहून सातत्याने माहिती दिली होती. आज दुसर्या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या 8 दिवसांत अतिशय कमी चाचण्या झाल्या आहेत. 19 एप्रिलला 36,556, 20 एप्रिल रोजी 45,350, 21 एप्रिल रोजी 47,270, 22 एप्रिल रोजी 46,874, 23 एप्रिल रोजी 41,826, 24 एप्रिल रोजी 39,584, 25 एपिल रोजी 40,298, 26 एप्रिल रोजी 28,338 अशा चाचण्या झाल्या आहेत. त्याची सरासरी 40,760 इतकी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
'मुंबईतील परिस्थिती हाताळणे अवघड होईल'
नागपूर जिल्ह्यात 40 लाख लोकसंख्येत या कालावधीतील ही सरासरी 26,792 चाचण्या प्रतिदिन अशी असून 68 लाखांच्या पुण्यात 22 हजार चाचण्या प्रतिदिन इतकी आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ 40 हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
'आरटीपीसीआर चाचण्या वाढवा'
आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ 40 टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत. 26 एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील 28 हजार चाचण्यांमधील 40 टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ 16,800 आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने 14 ते 18 टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर 25 ते 27 टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही, असं त्यांनी नमूद केलं आहे.
'केंद्राच्या निर्देशाचे पालन नाही'
राज्यात रविवारी 25 एप्रिल रोजी एकूण 2,88,281 चाचण्या नोंदविण्यात आल्या. त्यातील 1,70,245 आरटी-पीसीआर चाचण्या होत्या (59 टक्के), तर 1,18,036 चाचण्या या रॅपिड अँटीजेन (41 टक्के). तसेच सोमवारी दि. 26 एप्रिल रोजीचे सुद्धा चित्र असेच आहे. त्यादिवशी 37 टक्के अँटीजेन चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर हवे, असे केंद्र सरकारच्यावतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
'कोरोना बळींच्या आकड्यांचा ताळमेळ नाही'
मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. कारण, मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडविण्याचे काम होते आहे. रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्त्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्यानंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत सुद्धा आहे. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदविण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात अवघ्या 7 दिवसांत 4460 मृत्यू नोंदण्यात आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत 20 टक्के मृत्यू आहेत.