कासारसाई धरणात पाय घसरून पडल्याने युवकाचा बुडून मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कासारसाई धरणात पाय घसरून पडल्याने युवकाचा बुडून मृत्यू

पिंपरी-चिंचवड, दि. 24 मे – कासारसाई धरणात पाय घसरून पडल्याने 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रदुम गायकवाड असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. पाय घसरून पडल्याने तो धरणात बुडाला होता. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू च्या पथकाने धरणाच्या पाण्यात शोध घेऊन त्याचा मृतदेह शोधून काढला.

प्रदुम आपल्या कुटुंबासहित कासारसाई धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी आला होता. पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा पाय घसरला व तो खोल पाण्यात बुडाला. ही माहिती मिळताच शिवदुर्ग मित्रा आणि वन्यजीव रेंजर मावळची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह हाती लागला.