प्रेयसीशी शरीरसंबंध चालू असतानाच 60 वर्षीय व्यक्तीचा हॉटेलमध्ये मृत्यू

प्रेयसीशी शरीरसंबंध चालू असतानाच 60 वर्षीय व्यक्तीचा हॉटेलमध्ये मृत्यू

मुंबई, दि. 24 मे - मुंबईतील एका हॉटलमध्ये 23 मे रोजी सकाळी 40 वर्षीय महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना 60 वर्षीय वृद्ध बेशुद्ध पडला. महिलेने तत्काळ हॉटेलच्या स्टाफला कळवल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्‍टरांनी वृद्धाला तपासून मृत्‍यू झाल्याचे घोषित केले. महिलेने दावा केला की त्याची प्रेयसी होती.

पोलिसांनी सांगितले, की मृत्‍यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा वृद्ध व्यक्‍ती सकाळी दहाला महिलेसोबत कुर्लाच्या एका हॉटेलमध्ये पोहोचला होता. दोघे शरीरसंबंध ठेवत असतानाच तो बेशुद्ध पडला. त्याची हालचाल एकदम थांबल्याने आणि कोणतेच उत्तर देत नसल्याने तिला शंका आली. तिने तातडीने हॉटेलच्या रिसेप्शनला फोन करून ही बाब सांगितली. हॉटेलच्या स्टाफने कुर्ला पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन वृद्धाला सायनच्या सरकारी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्‍टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी महिलेला ताब्‍यात घेऊन कसून चौकशी केली तेव्हा कळले की, मृतक वृद्ध हा वरळीचा रहिवासी आहे आणि एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची प्रेयसीही त्याच्याच कंपनीत काम करते.  शरीरसंबंध प्रस्थापित करत असतानाच त्याने दारू पिण्याचा प्रयत्न केला आणि बेशुद्ध पडला.