कोळशाअभावी वीज निर्मितीत अनियमितता, राज्यात ४६.४ ने पारा चढला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
देशभर कोळशाची आणीबाणी
देशात १० दिवस पुरेल एवढाच साठा
ऐन उन्हाळ्यात विजेचे भारनियमन
६५७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द
कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्या सुसाट
मुंबई, दि. ३० एप्रिल - महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये वीजटंचाई निर्माण झाल्यानं भारनियमनाचं संकट गडद होऊ लागलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर जाऊन पोहोचला असून, विजेची मागणी वाढली आहे. मात्र, कोळसा टंचाई निर्माण झाल्यानं अनेक राज्यांत सात ते आठ तासांचं भारनियमन केलं जात आहे. दरम्यान, कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल ६५७ पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, केंद्रांकडे २२ मिलियन टन कोळसा आहे. जो फक्त १० दिवसांपर्यंत पुरेल. ८०% वीजनिर्मिती कोळशावर अवलंबून आहे. वीजनिर्मिती केंद्रांत या महिन्याच्या सुरुवातीस कोळशाचा साठा १७% पर्यंत कमी होऊन आवश्यक पातळीच्या एक तृतीयांश राहिला. उष्णतेमुळे वीजेची मागणी वाढत आहे. यामुळे अनेक राज्यांत वीज कपात सुरू आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, बिहार, झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली यासह इतर काही राज्य वीजटंचाईचा सामना करत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये भारनियमन केलं जात असून, तापमान वाढल्यानं विजेची मागणी वाढली, मात्र, अपुऱ्या प्रमाणात कोळसा पुरवठा होत असल्यानं विजेचा पुरवठा मर्यादित स्वरूपात होत आहे.
दरम्यान, विदर्भात पारा चांगलाच चढला आहे. शुक्रवारी चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांंकी ४६.४ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. तसेच कोकणात कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पुन्हा उष्णतेची लाट असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले असून २ मेपर्यंत ही लाट रहाणार आहे. शुक्रवारी राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. राज्यातील प्रमुख शहरात शुक्रवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) असे : चंद्रपूर ते 46.4, अकोला 45.8, ब्रह्मपुरी 45.6, अमरावती 45.0, बुलढाणा 42.8, नागपूर 45.0, वाशिम 43.5, वर्धा 45.5, औरंगाबाद 42.5, परभणी 44.2, नांदेड 43.2, अहमदनगर 43.6, जळगाव 44.8, मालेगाव 43.6, सोलापूर 43.4.