उन्हाळा सुसह्य होण्यासाठी कोणती फळे खावीत ?

उन्हाळा सुसह्य होण्यासाठी कोणती फळे खावीत ?

कलिंगड : उन्हाळयात ठिकठिकाणी दिसणाऱ्या या फळाशिवाय  उन्हाळा अर्धवटच राहील असं म्हणायला हरकत नाही. शरीराला आणि अगदी मनालासुद्धा कलिंगड थंडावा देते. कलिंगडं पौष्टिक आणि स्वस्त असतात. ती पाण्याचा उत्तम स्रोत तर आहेतच याशिवाय त्यातून व्हिटॅमिन A आणि C मुबलक प्रमाणात मिळते. व्हिटॅमिन A रोगप्रतिकार शक्ती वाढवते व ते डोळ्यांसाठीही चांगले असते. व्हिटॅमिन C सुद्धा प्रतिककार शक्ती वाढवण्याचे काम करते. कलिंगडामधें व्हिटॅमिन B6 आणि पोटॅशिअमहि असते.पोटॅशिअम शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करते तर  व्हिटॅमिन B6 रोगप्रतिकृशक्ती वाढवते. पोटॅशिअममुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते तसेच शरीरात येणाऱ्या स्नायूंच्या क्राम्पन्सना थांबवते. कलिंगड खाल्ल्याने उन्हापासून होणाऱ्या त्वचेच्या आजारांना आळा बसतो. तसेच कलनगडाच्या सेवनामुळे कर्करोग,उष्माघातासारख्या आजारांना प्रतिबंध राहतो. 
आंबा : जगात असे असंख्य लोक आहेत ज्यांना उन्हाळा आवडतो तो आंब्यांमुळे.आंब्यांमध्ये साखरेचं,कॅलरीज च प्रमाण जरी जास्त असलं तरी तो पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. त्याला "फळांचा राजा " म्हटले जाण्यामागे तशी करणे आहेत. आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण उत्तम प्रमाणात असते. त्याचप्रमाणे २० प्रकारची मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहेत. फायबरमुळे पचन चांगले होते आणि ते पोट भरण्यास मदतही करते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन  A,व्हिटॅमिन C नि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते. तसेच, आंब्यामध्ये असलेले झेक्सॅन्थिन हे रंगद्रव्य हानिकारक निळ्या किरणांना फिल्टर करून डोळ्यांचे संरक्षण करते.
पपई : आणखी एक उत्तम फळ जे तुम्ही उन्हाळ्यात खाऊ शकता ते म्हणजे पपई. हे फळ तुम्ही वाळलेले, पिकलेले किंवा न पिकलेले खाऊ शकता. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, फोलेट आणि विविध फायटोकेमिकल्स असतात.या फळामध्ये पपेन हे एक संयुग देखील असते जे तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यासाठी चांगले असते. हे अपचन आणि फुगवटा बरे करालादेखील  मदत करते, जे उन्हाळ्यात सामान्यतः जाणवते.पपई बीटा-कॅरोटीनचाही चांगला स्रोत आहे. हे त्वचेचे नुकसान टाळते आणि जळजळ कमी करते. पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील चांगले असते.  कर्करोग आणि गंभीर हृदयरोग टाळण्यास पपई  मदत करते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  व्यक्तीसाठी पपई  हा एक उत्तम पर्याय आहे.
द्राक्षे : द्राक्ष ही उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारं  फळ आह. द्राक्षे अँटीऑक्सिडंट म्हणून उत्तम काम करतात.त्याचप्रमाणे यात पोटॅशियमचे प्रमाण मुबलक आहे. तुमचे कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास तुमच्या आहारात द्राक्षांचा समावेश करा.द्राक्षे हृदय निरोगी ठेवायला मदत करतात . त्याचप्रमाणे गुडघ्यांसाठी  आणि मेंदूला चालना देण्यासाठी द्राक्षे उपयोगी आहेत. अपचन,डोळ्यांची झीज, विषाणूजन्य सौंसर्ग ,स्तनाचे कर्करोग अश्या विविध आजारांवर द्राक्षाचे सेवन नियंत्रण ठेवायला मदत करते. 
अननस : अननस हे उष्णकटिबंधीय फळांपैकी एक आहे. उन्हाळ्यात बनवल्या जाणार्याा प्रत्येक फ्रूट सॅलडचा हा एक भाग आहे. अननस चयापचय वाढवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते . ते उच्च रक्तदाब नियंत्रित करतात आणि कॅलरी बर्न करण्यास देखील मदत करतात.
स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीचा वापर अनादी काळापासून होत आहे.स्ट्रॉबेरीचा वापर त्वचेच्या समस्या, दात पांढरे करणे आणि पचन समस्यांसाठी केला जात असे.त्यांचा चमकदार रंग फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्समुळे आहे. स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज देखील भरपूर असतात. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात फोलेट आणि पोटॅशियम देखील असते.स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या क्वेर्सेटिन या फ्लेव्होनॉइडचे दाहक-विरोधी फायदे आहेत. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने उन्हाळ्याशी संबंधित त्वचा आणि आरोग्याच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.