आसामच्या महिला उपनिरीक्षकाने आपल्या भावी वराला पाठविले तुरुंगात
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
गुवाहाटी, दि. 11 मे - नौगाव पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांनी तिचा नियोजित वर राणा पोगाग विरुद्ध एफआयआर दाखल केला होता, ज्याने ONGC मध्ये कथित जनसंपर्क अधिकारी असल्याचा दावा केला होता. सध्या नौगाव पोलीस राणाला दोन दिवस पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करत आहेत. काही महिन्यांपूर्वीही या महिला उपनिरीक्षकाने सत्ताधारी भाजप आमदाराला फोनवर सडेतोड उत्तर दिले होते, ज्याची मीडियात जोरदार चर्चा झाली होती.
जुनमोनी आणि राणा यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट झाली आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते लग्न करणार होते. नौगाव पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पोलिस उपनिरीक्षक जुनमोनी यांना लग्नानंतरच समजले की, ती ज्या व्यक्तीला तिचा जीवनसाथी बनवणार आहे, तो खरोखरच कथित फसवणूक करणारा आहे.
तक्रारीनुसार, आरोपी पोगागने जुनमोनी यांची पहिल्या भेटीत ओएनजीसीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ओळख करून दिली होती. पण लग्नानंतर, जुनमोनीला असे अनेक पुरावे सापडले, ज्यामुळे तिला तिच्या भावी वरावर संशय येऊ लागला. याबाबत तिने अधिक चौकशी सुरू केली असता फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. अनेकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जुनमोनी माजुलीमध्ये तैनात असताना दोघे पहिल्यांदा भेटले होते. राणा हा माजुलीचाच रहिवासी आहे. अनेक भेटीनंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही महिन्यांनंतर दोघेही आपापल्या घरच्यांच्या आशीर्वादाने लग्नाच्या तयारीत गुंतले.
जुनमोनी म्हणते, "माझी पोस्टिंग माजुलीमध्ये झाली होती आणि मी त्यांना जानेवारी 2021 मध्ये भेटले होते. माझ्या एका ओळखीच्या स्टेशन प्रभारीने त्याच्याशी ओळख करून दिली होती. पोलीस अधिकाऱ्यांशी त्याची चांगलीच ओळख होती. त्यामुळे पोलिसां बरोबर आपली ओळख टिकवून ठेवल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल असे त्याला वाटले असावे. त्याची अशी मानसिकता असावी."
या ओळखीनंतर त्याने मला प्रपोज केले. मी म्हणाले की मला काही अडचण नाही पण घरच्यांशी बोलायला लागेल. मग आमच्या दोघांच्या कुटुंबीयांची भेट झाली आणि लग्न पक्क झालं. काही दिवसांनी आमची एंगेजमेंट झाली. दरम्यान माझी बदली नौगावला झाली. पण इथे आल्यानंतर मला त्याच्या कामाशी संबंधित काही गोष्टींबद्दल संशय आला. मी थोडी चौकशी केली तेव्हा मला अशा काही गोष्टी कळल्या की माझे डोळे उघडले.
राणा यांनी स्वत:चे ओएनजीसीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून वर्णन केले होते. कॉर्पोरेटच्या सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत ग्रामीण विकासाचे काम पाहत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मी येथील प्रतिष्ठित कॉटन कॉलेजमधून जनसंवाद आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले, त्यामुळे जनसंपर्क अधिकाऱ्याची प्रतिमा पाहून मी खूप प्रभावित झाले. त्यामुळे ती व्यक्ती 420 असू शकते, असा विचार एकदाही मनात आला नाही.
ज्या व्यक्तीची त्याने 25 लाख रुपयांची फसवणूक केली होती, त्याने स्वत: येऊन राणाचे सर्व गैरकृत्य सांगितले. याबाबत मी राणाला सातत्याने विचारणा केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. त्याने माझ्यासोबत खूप फसवणूक केली असल्याने त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. मी प्रेमात वेडेपणाने शोक करणारी मुलगी नाही. मी लगेच एफआरआय दाखल केली.
आरोपी राणाकडून अनेक कागदपत्रे आणि ओएनजीसीचे सील जप्त करण्यात आल्याचा दावा नौगाव पोलिसांनी केला आहे. समोरच्या व्यक्तीवर आपला रुबाब दाखवण्यासाठी राणा नेहमी वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि ड्रायव्हर सोबत ठेवत असे.