महिला अधिकाऱ्यावरील ईडीच्या छाप्यात 150 कोटी रुपयांची संपत्ती, 25 कोटी रुपये रोख सापडले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
झारखंड, दि. 7 मे - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी बिहार, झारखंडमध्ये मोठी कारवाई करत वरिष्ठ आयएएस आणि झारखंडच्या खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दोन डझन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या सनदी लेखापालकडून १९ कोटी ३१ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून १५० कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीने पूजा यांचे सासरे कामेश्वर झा यांचे मुजफ्फरपूरचे घर, दिल्लीत आई-वडिलांचे घर तसेच कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही छापे टाकले.
कोण आहेत पूजा सिंघल
पूजा सिंघल अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाल्या होत्या. त्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या राहिल्या, मग अर्जुन मुंडा असो, रघुवर दास असो की हेमंत सोरेन. कमी वयात आयएएस झाल्याने त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै २०३८ पर्यंत आहे. त्यांनी १९९९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी विवाह केला. २००४ मध्ये हजारीबागमध्ये राहुल उपायुक्त आणि पूजा एसडीओ होत्या. तेथे पती-पत्नीत वाद झाला. अखेर घटस्फोट झाला. २०१० मध्ये पूजा यांनी डॉ. अभिषेक झा यांच्याशी विवाह केला.
२०१३ मध्ये पलामूमध्ये पूजा उपायुक्त असताना खासगी कंपनीला कठौतिया खाण पट्टा वाटप केला. यावरूनही वाद झाला. त्याची अद्यापही चौकशी सुरू आहे. त्या चतरामध्ये मनरेगा योजनेत दोन एनजीओंना ६ कोटी रु. देण्यावरूनही चर्चेत आल्या आहेत. ही रक्कम मुसळी उत्पादनाच्या नावावर दिली होती, मात्र मनरेगामध्ये अशी तरतूद नव्हती. २००९-१० मध्ये पूजा खूंटी जिल्ह्याच्या उपायुक्त झाल्या तेव्हा मनरेगाच्या १८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत त्यांच्याविरुद्ध १६ गुन्हे दाखल झाले होते.