गॅसचा दरवाढीचा भडका उडाला; 50 रुपयांनी सिलिंडर महागले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 7 मे - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शनिवारी 50 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर मुंबईतील एका सिलिंडरचा दर 1 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचे खिसे रिकामे होत आहेत. कारण आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनता हैराण झाली आहे.
नवीन दरानुसार, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवरून 2355.50 रुपये झाली आहे. त्याचबरोबर पाच किलोचा एलपीजी सिलिंडर 655 रुपयांचा झाला आहे.
व्यावसायिक सिलिंडर प्रचंड महागल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. खाद्यपदार्थांचे दर त्यामुळे अवाच्या सवा वाढले आहेत. सामान्य माणसाला आता हॉटेलमद्ये शिरण्याआधी 100 वेळा विचार करावा लागेल तसेच खिसाही तपासून पाहावा लागणार आहे.
केंद्र सरकारने लाखो गरीब लोकांना सुरुवातीला फुकट गॅस कनेक्शन दिले खरे पण आता गॅसची किंमत प्रचंड वाढल्याने गॅस वापरणे या लोकांनी सोडून दिले असून पुन्हा जुन्या पारंपरिक पद्धतीकडे वळले आहेत. एकंदरीतच मुफ्त गॅस योजनेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.