“भाजपने संपूर्ण देशात रॉकेल शिंपडले आहे” राहुल गांधींचा लंडनमध्ये आरोप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

“भाजपने संपूर्ण देशात रॉकेल शिंपडले आहे” राहुल गांधींचा लंडनमध्ये आरोप

लंडन, दि. 21 मे – सध्या भारताची स्थिती चांगली नाही. भाजपने देशभर रॉकेल शिंपडले आहे. एकाद्या ठिकाणी ठिणगी पडून आग लागेल आणि ती देशभर पसरेल.  आम्ही मोठ्या संकटात पडू. लोकांना, समाजाला, राज्यांना आणि धर्मांना एकत्र आणणे ही विरोधी पक्षाची, अगदी काँग्रेसचीही जबाबदारी आहे, असे मला वाटते. आम्हाला या तापमानाला थंड करणे आवश्यक आहे कारण हे तापमान थंड केले नाही तर चुकीच्या गोष्टी घडू शकतात असे राहूल गांधी म्हणाले आहेत. आयडियाज फॉर इंडिया परिषदेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले आहेत. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी एक मुलाखतही दिली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला.

कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना विचारण्यात आले की, भाजप निवडणूक का जिंकत आहे? काँग्रेस का हरत आहे? तर प्रत्युत्तरात राहुल म्हणाले की, ध्रुवीकरण आणि एकूण मीडिया वर्चस्वाचा भाजपला फायदा झाला आहे. शिवाय आरएसएसने एक रचना तयार केली आहे जी मोठ्या प्रमाणावर घुसली आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसने अशी चौकट तयार करण्याची गरज आहे. राहुल म्हणाले की, जे ६०-७० टक्के लोक भाजपला मत देत नाहीत, त्यांच्याकडे अधिक आक्रमकपणे जाण्याची गरज आहे आणि ते करायला हवे.

ज्या संस्थांनी देशाची उभारणी केली, त्यांच्यावर होणारे हल्ले भारतातील जनता पाहत असल्याचे राहुल म्हणाले. या संस्था आता डीप स्टेटच्या ताब्यात आहेत. सीताराम येचुरी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, आरजेडी नेते तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी नेते राहुल यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते.

रशिया जे युक्रेनमध्ये करत आहे तसंच चीन लडाखमध्ये करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. मोदी सरकारला या मुद्द्यावर बोलायचेही नाही, असे काँग्रेस नेते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, चिनी सैन्य लडाख आणि डोकलाम या दोन्ही ठिकाणी तळ ठोकून आहेत. ते म्हणाले की, चिनी सैन्याने नुकताच पॅंगॉन्ग तलावावर मोठा पूल बांधला आहे. ते पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत. ते स्पष्टपणे काहीतरी तयारी करत आहेत. मात्र सरकारला याबाबत बोलायचे नाही. सरकारला चर्चा दडपायची आहे. हे भारताच्या दृष्टीने वाईट आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि आरएसएसचा असा विश्वास आहे की भारत हा भूगोल आहे, तो 'सोने की चिडिया' आहे ज्याचा नफा मोजक्या लोकांमध्ये वाटून घ्यावा. सर्वांना समान नफा मिळाला पाहिजे असे आमचे मत आहे.

राहुल म्हणाले की, मी स्वत:ला भारताच्या त्या कल्पनेचे रक्षण करणारी व्यक्ती म्हणून पाहतो. जेव्हा मी माझ्या देशाचा आवाज चिरडलेला पाहतो तेव्हा मला त्रास होतो. मी काय करावे आणि काय करावे याचा मी विचार करतो. ही एक आव्हानात्मक परिस्थिती आहे परंतु मला वाटते की या गोष्टीमध्ये खूप मोठी संधी आहे आणि मला ती जाणवते.