नव्याने मालमत्ता कराची नोंदणी करणाऱ्यांना 5 टक्के सवलत मिळणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 7 मे - पिंपरी चिंचवड शहरामध्ये ब-याच मिळकती नव्याने उभारण्यात आल्या असून कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे काही नव्याने उभारण्यात आलेल्या मिळकतींची करआकारणी झालेली नाही. कोरोना साथरोगाच्या कालावधीमध्ये महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. ज्या मिळकतींची करआकारणी झालेली नाही, अशा मिळकतींची करआकारणी करण्यासाठी महापालिकेने धोरण निश्चित केलेले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या नवीन अथवा वाढीव बांधकाम झालेल्या मिळकतींची कर आकारणी अद्याप झालेली नाही, अशा मिळकतींची करआकारणीसाठी जर मिळकतधारक स्वयंस्फूर्तीने स्वत: बांधकामांची नोंद करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अर्ज करत असेल तर अशा नागरिकांना प्रोत्साहन व मिळकतकरामध्ये महापालिकेकडून ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक मा. राजेश पाटील यांनी दिली आहे.
मालमत्ताधारकांने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले. अनधिकृत बांधकामाचीही नोंद करता येणार असून या मालमत्तांना शास्तीकर लागणार आहे. याबाबतची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.
PCMC Property Registration : घरबसल्या 'अशी' करू शकता मालमत्तेची नोंदणी!
ही योजना गेल्या वर्षी लागू केलेली असली. तरी, या योजनेचा पुढील टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. स्वतः आकारणी करून स्वतःच ती आकारणी अंतिम टप्यापर्यंत नेणे हे या योजनेतील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल आहे.
लोकसहभागावर भर
लोकशाहीमध्ये लोकांना कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे महत्त्वाचे असते. लोकांच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेऊन प्रशासकीय यंत्रणा प्रतिसादशील व गतिमान करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले,"कोरोना काळात अनेक बांधकामे नव्याने झाल्याचे निदर्शनास आले आहेत, अशा मिळकतींची कर आकारणी होणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेत जलद प्रक्रीयेसाठी व नागरिकांच्या मालमत्तेची नोंद व्हावी, याकरीता महापालिकेमार्फत (PCMC TAX) “माझी मिळकत माझी आकारणी" ही योजना राबविण्यात येत आहे.
Pimpri Municipal Corporation : शहरातील एक लाख मालमत्तांची महापालिकेकडे नोंदच नाही!
कर किती व कसा आकारला जातो, याबाबत नागरिकांना माहीती नसल्याने मालमत्तेची नोंदणी होत नाही. त्यामुळे कर रुपातून महापालिकेचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागृतीसाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे".
"या योजनेद्वारे करदात्याला सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतः च्या मिळकतीची आकारणी स्वतःच करता येणार आहे. एवढेच नाही तर कर आकारणी मान्य असल्यास लगेचच मिळकत कर भरता येणार आहे. कर भरल्यानंतर महापालिकेमार्फत भौतिक सर्वेक्षण म्हणजे प्रत्यक्ष मोजमाप करण्यात येते आणि त्या सर्वेक्षणच्या आधारे संबंधित अर्जानुसार कर आकारणी केली जाते.या पद्धतीमध्ये जाणारा वेळ, होणारी दिरंगाई टाळण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल महापालिका उचलत आहे. मे, जून महिन्यात पथदर्शी स्वरुपात ही योजना राबविण्यात येणार आहे".
मिळकतधारकाने स्वत: www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावरील शिघ्रगणकाद्वारे मिळकतकराच्या नोंदणीसाठी अर्ज करून करआकारणी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या सेवेमुळे कोणत्याही मिळकत करदात्याला, नागरिकांना स्वतच्या नवीन मिळकतीची, मिळकतीच्या बदलाची किंवा वापरातील बदलाची नोंद स्वतहून करता येणार आहे.
या बदलाची नोंद मिळकत करदात्याने केल्यानंतर सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे. तसेच या मिळकतीची नोंद महापालिकेच्या (PCMC TAX) करआकारणी रजिस्टरला देखील होणार आहे. हा उपक्रम कदाचित देशातील पहिला उपक्रम असेल, असा दावाही देशमुख यांनी केला.
अनधिकृत बांधकामाचीही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्या बांधकामाला शास्तीकर लागू होईल.ऑनलाइन अर्ज भरताना अनधिकृत बांधकाम अधिकृत दाखविल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.