अबब ! 'हा' आहे जगातील सर्वात मोठा हिरा, तब्ब्ल चार अब्ज रुपयांना झाला लिलाव !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली - जगात अनेक प्रकारचे हिरे आढळतात, ज्यांच्या किंमती वेगवेगळ्या असतात. नुकताच जगातील सर्वात मोठा हिरा सापडला आहे, ज्याचा रंग निळा आहे. या निळ्या रंगाच्या हिऱ्याची किंमत तब्ब्ल ४.४ अब्ज आहे. कोहिनूर हा जगातील सर्वात महागडा हिरा असल्याचे अनेक अहवालांचे मत आहे. याशिवाय हा जगातील सर्वात मोठा हिरा असल्याचेही मानले जाते.
हाँगकाँगमध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला आहे. याचा लिलाव फाइन आर्ट्स कंपनी सोथबीजने केला आहे. कंपनीने म्हटले आहे की १५.१० कॅरेट स्टेप कट रत्न आहे ज्याला 'द डी बियर्स कलिनन ब्लू' असे नाव देण्यात आले आहे. या हिऱ्याचा लिलाव आठ मिनिटे चालला. हा हिरा खरेदी करण्यासाठी चार जणांनी बोली लावली होती. चला जाणून घेऊया जगातील सर्वात मोठा हिरा कोणी विकत घेतला?
या बोलीमध्ये चार जणांचा सहभाग होता, मात्र एका अज्ञात व्यक्तीने ही बोली जिंकली. एका अज्ञात व्यक्तीने हिरा खरेदी करण्यासाठी ४८ दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्ब्ल ४.४ अब्जची सर्वाधिक बोली लावली.
हा दुर्मिळ हिरा २०२१ साली सापडला होता. दक्षिण आफ्रिकेतील कुलीनन खाणीत सापडलेल्या या हिऱ्याला रंगीत हिऱ्यांमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. अमेरिकेच्या जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने या हिऱ्याला 'फॅन्सी व्हिव्हिड ब्लू' म्हणून वर्गीकृत केल्याचे सोथेबीजने नोंदवले आहे.
संस्थेला आतापर्यंत पाठवलेल्या सर्व निळ्या हिऱ्यांमध्ये त्याची रंगीत प्रतवारी सर्वोच्च पातळीवर आहे. आतापर्यंत फक्त एक टक्का हिऱ्यांची प्रतवारी सर्वोच्च आहे. सोथबीजने नोंदवले आहे हा हिरा विलक्षण दुर्मिळ आहेत.
आतापर्यंत १० कॅरेटपेक्षा जास्त आकाराच्या पाच रत्नांचा लिलाव झाल्याचे सांगण्यात आले आहे. कधीही, कोणतेही रत्न १५ कॅरेटपेक्षा जास्त नसतो. या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घटना म्हणजे या सर्वात मोठ्या हिऱ्याचा लिलाव.
सर्वात महागडा हिरा होण्याचा विक्रम चुकला !
जगातील सर्वात महागड्या हिर्याचे नाव 'ओपेनहाइमर ब्लू' असून तो 14.62 कॅरेटचा आहे. या हिऱ्याचा 2016 मध्ये $57,541,779 (4,404,218,780 रुपये) लिलाव झाला होता. डी बियर्स कलिनन ब्लू डायमंडचा लिलाव $57,471,960 किंवा 4.4 अब्ज रुपयांना झाला आहे. या हिऱ्याच्या लिलावात आणखी 70,000 डॉलर्सची भर पडली असती तर जगातील सर्वात महागडा हिरा होण्याचा विक्रम केला असता.