एलपीजी सिलिंडरवर एक्सपायरी डेट का असते? 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एलपीजी सिलिंडरवर एक्सपायरी डेट का असते? 
नवी दिल्ली  -

आपल्याला आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तूंच्या, पदार्थांच्या किंवा औषधांच्या वेष्टनावरील एक्सपायरी डेटबद्दल माहिती होती. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही वापरत असलेल्या गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेटदेखील (कालबाह्यता तारीख) असते? जर तुम्हाला माहित नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ते जाणून घेण्याचा मार्ग. तुमच्या घरात येणाऱ्या सिलिंडरवरील एक्सपायरी डेट जर उलटून गेलेली असेल तर असा सिलेंडर धोकादायक ठरू शकतो. म्हणून हे खूप गरजेचे आहे की जेव्हा जेव्हा सिलेंडर येईल तेव्हा आपण त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासावी. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

० 'येथे' एक्सपायरी डेट लिहिलेली असते 
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांच्या एलपीजी सिलिंडरवर तीन पट्ट्या दिसतात. यामध्ये सिलेंडरचे वजन दोन पट्ट्यांवर आणि काही संख्या तिसऱ्या पट्टीवर लिहिलेल्या असतात. वास्तविक हीच सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. 

० सिलिंडरची एक्सपायरी डेट कशी तपासायची? 
तुम्ही पाहिले असेल की सिलेंडरच्या पट्टीवर A-22, B-24 किंवा C-23, D-21 असे लिहिलेले असते. ही चार अक्षरे महिन्यांमध्ये विभागली गेली आहेत-
A म्हणजे जानेवारी ते मार्च
B म्हणजे एप्रिल ते जून
C म्हणजे जुलै ते सप्टेंबर
D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर.
A, B, C आणि D या अंकांनंतर लिहिलेली संख्या म्हणजे एक्सपायरी किंवा कालबाह्यता वर्ष. म्हणजेच, जर पट्टीवर डी -22 लिहिले असेल तर सिलेंडर डिसेंबर 2022 रोजी संपेल. प्रत्येक एलपीजी गॅस सिलिंडर वापरण्यासाठी एक कालमर्यादा आहे. या कालावधीनंतर सिलेंडरची चाचणी घ्यावी लागते. जर सिलिंडर चाचणीमध्ये वापरण्यायोग्य नसेल तर ते बाजारातून काढून टाकले जाते.

० सिलिंडरची चाचणी कुठे केली जाते? 
गॅस सिलिंडर प्लांटमध्ये सिलिंडरची चाचणी केली जाते. बऱ्याच वेळा लोक वर्षानुवर्षे सिलेंडर वापरत नाहीत. अशा परिस्थितीत, अशा सिलिंडरची तपासणी करणे खूप महत्वाचे बनते. जर तपास झाला नाही तर मोठा अपघात होऊ शकतो.