कर्नाटक सरकारची नाचक्की; पीएसआय भरतीची परीक्षा रद्द

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कर्नाटक सरकारची नाचक्की; पीएसआय भरतीची परीक्षा रद्द

बंगळुरू, दि. २९ एप्रिल - कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक  भरती परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी भाजप  नेत्या दिव्या हागरगी यांना पुण्यातून अटक झाली आहे. या प्रकरणी कर्नाटकातील भाजप सरकार अडचणीत आलं आहे. अखेर मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्र्यांनी पीएसआय भरती परीक्षाच रद्द करण्याची घोषणा केली आहे.

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा गैरव्यवहारामुळे वातावरण तापलं आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू झाल्यानंतर सरकारनं ही परीक्षाच रद्द केली आहे. याबाबतची घोषणा गृहमंत्री अरगा जनेंद्र यांनी केली. ते म्हणाले की, कर्नाटक सरकारने पीएसआय भरती परीक्षा रद्द केली आहे. आता नव्याने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. या परीक्षेतील गैरप्रकार सीआयडी तपासात समोर आला आहे.

दरम्यान, दिव्या हागरगी मागील काही दिवसांपासून पुण्यात लपून बसल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सीआयडीच्या पथकानं त्यांना पुण्यातून अटक केली आहे. त्या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपाच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या. पण हा घोटाळा उघडकीस येताच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यापासून अंतर राखलं आहे. दिव्या यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

पण दिव्या हागरगी ह्या भाजपामध्ये सक्रिय होत्या. तसेच त्यांच्याकडे कलबुर्गी येथील भाजपाच्या महिला युनिटचं अध्यक्षपद होतं, याची पुष्टी स्थानिक लोक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. आरोपी महिला दिव्या हागरगी यांची कलबुर्गी येथे ‘ज्ञान ज्योती संस्था’ नावाची शैक्षणिक संस्था आहे. त्यांच्या संस्थेत ऑक्टोबर २०२१ मध्ये पीएसआय परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेत वीरेश नावाच्या एका उमेदवाराला १२१ गुण मिळाले होते. संबंधित परीक्षेत वीरेशचा सातवा क्रमांक आला होता. पण त्यानं केवळ २१ प्रश्न सोडवले असताना त्याला इतके गुण कसे मिळाले? याबाबत संशय आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

त्यानुसार पोलिसांनी दिव्या यांच्या पतीसह एकूण १७ जणांना यापूर्वीच अटक केली होती. पण दिव्या हागरगी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं त्यांना पुण्यातून अटक केली आहे. दिव्या यांच्या संस्थेत पीएसआय परीक्षा सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले होते. तसेच परीक्षार्थींना इतरही पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या नव्हत्या. दिव्या यांच्या संस्थेत वीरेशसह इतरही अनेक उमेदवारांनी गैरव्यवहार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.