पंजाबमध्ये शिवसेना समर्थक व खलिस्तान समर्थक यांच्यात तुफान दगडफेक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पतियाला (पंजाब), दि. २९ एप्रिल - पंजाबमधील पतियाला येथे आज दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान संघर्ष झाला. शिवसेनेनं खलिस्तानी गटांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान हा सारा गोंधळ घडला. पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चावर दगडफेक करण्यात आली. या संघर्षामध्ये तलावारीही उपसण्यात आल्याने वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला होता.
काही शीख गटांच्या लोकांचा शिवसैनिकांसोबत या मोर्चादरम्यान वाद झाला. दोन्हीकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला. शिवसैनिक ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. पाहता पाहता अचानक दगडफेक सुरु झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.
या मोर्चामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक तलवारी उपसून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. काहीजण पोलिसांशी वाद घालत आहेत तर काही दगडफेक करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिराच्या बाजूच्या इमारतीवर उभी राहून खाली जमलेल्या लोकांवर दगडफेक करताना दिसत आहे.
या सर्व गोंधळावर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस निर्देशकांशी आपली चर्चा झाल्याची माहिती दिली. तसेच या परिसरामध्ये सध्या शांतता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. “पतियालामध्ये घडलेला प्रकार दुर्देवी आहे. मी डीजीपींसोबत बोललो आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात आलीय. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यावर आमचं लक्ष आहे. पंजाबची शांतता सर्वात महत्वाची आहे,” असं मान यांनी म्हटलंय.
या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता बाळगण्याचं आव्हान करत आपआपसातील वाद आणि मतभेद चर्चेने सोडवण्याचं आवाहन केलंय.