जम्मू-काश्मीरमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा! इलेकट्रिक वाहने स्वस्त होणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जम्मू-काश्मीरमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा! इलेकट्रिक वाहने स्वस्त होणार

नवी दिल्ली (प्रबोधन न्यूज) - केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. लिथियम हा नॉन-फेरस धातू आहे जो मोबाईल, इलेक्ट्रिक वाहने इत्यादींच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. खाण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, 'भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाला प्रथमच जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात 5.9 दशलक्ष टन लिथियम संसाधनांचा साठा सापडला आहे.

हे ब्लॉक्स भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने 2018-19 पासून आजपर्यंतच्या क्षेत्रीय हंगामात केलेल्या कामाच्या आधारे तयार केले आहेत. याशिवाय, एकूण 7,897 दशलक्ष टन संसाधनांसह कोळसा आणि लिग्नाइटचे 17 अहवाल कोळसा मंत्रालयाला सादर करण्यात आले आहेत. बैठकीदरम्यान जीएसआय कार्यरत असलेल्या विविध थीम वर सात प्रकाशने देखील जारी करण्यात आली आहेत.

तसेच आगामी फील्ड हंगाम 2023-24 साठी प्रस्तावित वार्षिक कार्यक्रम देखील बैठकीत सादर करण्यात आला आणि त्यावर चर्चा करण्यात आली. 2023-24 दरम्यान, GSI ने 12 सागरी खनिज उत्खनन प्रकल्पांसह 318 खनिज उत्खनन प्रकल्प व इतर 966 कार्यक्रम हाती घेण्याची योजना आखली आहे. तसेच धोरणात्मकदृष्ट्या-महत्त्वाच्या आणि खतांच्या खनिजांच्या शोधावर विशेष भर देण्यात आला आहे.

जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे. लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो.

लिथियम, निकेल आणि कोबाल्ट यांसारखी खनिजे मोबाईल फोन, सोलार पॅनेलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जातात. ही खनिजे आपण ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनामधून आयात करतो. परंतु आता लिथियमचे साठे भारतात सापडल्याने भारत इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीत आत्मनिर्भर होऊ शकतो.

देशात लिथियमचे साठे सापडल्याने देशातल्या इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्रीला मोठी संजीवनी मिळाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगात सध्या अमेरिका आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. भारतात वाहनांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत आता अमेरिका आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.