महावितरणच्या धोकादायक वीज वाहिन्या होणार भूमिगत! - तळवडे, रुपीनगरमधील रहिवाशांना दिलासा - भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once




पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  उघड्यवरील उच्चदाब आणि लघुदाब वीजवाहिन्यांमुळे रुपीनगर, तळवडे भागात शॉर्ट सर्किट अथवा नागरिकांचा स्पर्श झाल्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर या परिसरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले आहे.

रुपीनगर येथील विकास सोसायटीमध्ये विक्रम हिवरे यांच्या घरी शॉर्टसर्किट झाले.  उघड्यावरील वीजवाहिन्यांमुळे रहिवाशांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे माजी नगरसेवक शांतराम भालेकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अशा घटना पुन्हा घडू नयेत. या करिता आमदार महेश लांडगे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांत वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू करण्यात आले.

माजी नगरसेवक शांताराम भालेकर, माजी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, रमेश भालेकर, सोमनाथ मेमाणे, भाऊसाहेब काळोखे, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, अस्मिता भालेकर, शिरीष उत्तेकर, राहुल पिंगळे, रवी शेतसंधी आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे येथे विविध गृहनिर्माण सोसायटी, रुपीनगर येथील हनुमान मंदिर ते काळे महाराज मंदिर दरम्यान महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले. वीजवाहिन्या उघड्यावर असल्यामुळे शॉर्ट सर्किट होवून एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. स्थानिक नागरिकांमध्ये वीज वाहिन्यांमुळे भीतीचे वातावरण होते. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तात्काळ काम हाती घ्यावे, अशी सूचना केली होती.

महावितरण  प्रशासनाकडून आज वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आगामी काळात मतदार संघातील सर्वच वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही सतर्क आहोत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.