भोसरीच्या घाटात पुन्हा घुमणार भिर्रर्र... बारी झाली
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
एप्रिल महिन्यात होणार भोसरीत बैलगाडा शर्यत
पिंपरी-चिंचवड, दि. 30 मार्च - सर्वोच्च न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे देशात बैलगाडा शर्यतींवर निर्बंध होते. मागील महिन्यात हे निर्बंध उठल्यामुळे आता अनेक वर्षांनी भोसरीच्या घाटात आता पुन्हा घुमणार ‘भिर्रर्र... बारी झाली’ चा आवाज. भाजपाचा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. आता एप्रिल महिन्यात भोसरीतील घाटावर पुन्हा बैलगाडा शर्यतींचा थरार नागरिकांना पहायला मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आणि पुणे जिल्हा गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष भानूदास लांडगे यांच्या सह माजी नगरसेवक पंडीत गवळी, विलास (कारभारी) फुगे, मदन गव्हाणे, गणपत गव्हाणे, सुदाम माने पाटील, निवृती लांडगे, भानुदास फुगे, श्रीकांत लांडगे, विनायक लांडगे, दिपक लांडगे तसेच गाडा मालक संघटनेचे पदाधिकारी व भोसरीतील गाडा मालक यांनी भोसरीतील बैलगाडा घाटाची सोमवारी पाहणी केली. यावेळी ‘ई’ प्रभागाचे कनिष्ठ अभियंता विवेक ताकवले उपस्थित होते. सर्व्हे नं. १ येथील घाटाची सिमाभिंत, राडारोडा उचलणे, भोसरी गावच्या कुस्तीच्या जुन्या आखाड्याची रंगरंगोटी आणि दुरुस्ती करणे, साफसफाई करणे ही कामे वेगाने सुरु असून गावयात्रेच्या अगोदर पुर्ण करण्याचे नियोजन आहे अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.