म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला, नीलम गोऱ्हे यांचं स्पष्टीकरण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला, नीलम गोऱ्हे यांचं स्पष्टीकरण

    मुंबई , (प्रबोधन न्यूज )   -      महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. पण, नीलम गोऱ्हे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून शिवसेनेत प्रवेश का गेला याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

आज गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर निशाणा साधला आहे. निलम गोऱ्हे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे यांचं पत्र

'गेल्या 25 वर्षांपासून एनडीएसोबत राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आले. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर एनडीएने आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरिक कायद्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहे.पंतप्रधान मोदी आणि अमनित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे, असं नीलम गोऱ्हे पत्रात म्हणाल्या.