घराणेशाहीचे राजकारण संपवायचे आहे - करूणा मुंडे 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

घराणेशाहीचे राजकारण संपवायचे आहे - करूणा मुंडे 
पुणे - 
धनंजय मुंडेंपेक्षा राज्यात करुणा मुंडेंच्याच नावाची चर्चा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सुरु आहे. कुठेही न्याय मिळत नाहीये. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासाठी आंदोलने करावी लागत आहेत. हे राजकारण संपवण्यासाठी मी एक मोहिम सुरु केली आहे. घराणेशाहीचे राजकारण मला संपवायचे आहे, असे विधान करुणा मुंडे यांनी पुण्यात केले. अन्यायाविरुद्ध मी मोहिम सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून मी एक एक कार्यकर्त्यांना जोडणार आहे, असे पुढे करुणा मुंडे म्हणाल्या.

देशभरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली असताना राज्यातही त्याचे पडसाद उमटत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर आता राज्यातल्या निवडणुकांकडे लक्ष वळवले आहे. अहमदनगरमध्ये करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना असं नाव असलेल्या पक्षाची स्थापना केली आहे.

माध्यमांशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या पतीला मी सांगायचे की तुमच्यावर इतिहास रचला जाईल. पण मला हे माहिती नव्हतं की माझ्या पतीवर नाही तर माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे जिने आपल्या पतीविरोधात आवाज उठवला आहे. मंत्री असणाऱ्या पतीने दोन मुलांची आई असणाऱ्या मला १६ दिवस तुरुंगात पाठवले. महाराष्ट्रात राजकीय पक्ष काढणारी मी पहिली महिला आहे. मी घराणेशाहीच्या घाणेरडे राजकारणाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. जास्तीत जास्त महिलांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मी जे करत आहे त्यासाठी अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे मला फोन आले आहेत. त्यांनी आमच्यात हिंमत नाही पण आम्ही तुम्हाला मागून पाठिंबा देऊ शकतो असे सांगितले. मी महिलांना एकच सांगेल की या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
माझा पक्ष आणि मी येणार्‍या प्रत्येक निवडणुका राज्यात लढणार आहे. मी निवडणूक लढण्याबाबत अद्याप पर्यंत विचार केला नाही. पण माझ्या पक्षाची जर इच्छा असेल की, तर मी परळी विधानसभा मतदार संघातून निवडणुका लढणार आहे, अशी भूमिका करुणा मुंडे यांनी मांडली आहे.