आयएमए पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ सातव तर सचिवपदी डॉ पाटील

आयएमए पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ सातव तर सचिवपदी डॉ पाटील

पिंपरी-चिंचवड, दि. १६ एप्रिल - इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (आयएमए- पीसीबी) च्या अध्यक्षपदी डॉ विजय सातव तर सचिवपदी डॉ हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन कार्यकारीणी हस्तांतरण सोहळा वाकड येथे पार पडला.  मावळते अध्यक्ष डॉ संजीव दात्ये यांनी सूत्र नूतन अध्यक्ष डॉ विजय सातव यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द केली.

सदरील कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ सुहास पिंगळे यांचे अध्यक्षतेखाली माजी पोलीस उप महासंचालक जयंत उमराणीकर, डॉ दिलीप कामत, डॉ मंगेश पाटे, डॉ जयंत नवरंगे, डॉ रवींद्र कुटे यांचे ऊपस्थित पार पडला. सन २०२२-२३ ची कार्यकरणी मध्ये निवड झालेल्या सर्व सभासदांची ओळख अध्यक्षांनी करून दिली. डॉ दिलीप कामत यांनी प्रास्तविक केले. माजी पोलिस महासंचालक उमराणीकर, डॉ. जयंत नवरंगे, डॉ सहास पिंगळे, डॉ मंगेश पाटे यांनी मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष डॉ दात्ये व माजी सचिव डॉ मंदार डोईफोडे यांनी २०२१-२२ मधील केलेल्या कामकाजाचे सविस्तर माहिती देत नूतन अध्यक्ष व कार्यकारीणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्रीरंग गोखले यांनी केले. आभार डॉ सुशिल मुथियान यांनी मानले. अशी माहिती संचालक जनसंपर्क डॉ प्रकाश रोकडे यांनी दिली.

नियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - डॉ विजय सातव (अध्यक्ष), डॉ. हेमंत पाटील (सचिव), डॉ. संजीव दात्ये (माजी अध्यक्ष), डॉ. सुशील मुथियान (नियोजित अध्यक्ष), डॉ. माया भालेराव, डॉ. सुधीर भालेराव, डॉ.शुभांगी कोठारी (तिघेही उपाध्यक्ष),  डॉ.अनिरुद्ध टोणगावकर (खजिनदार) आदी सदस्यांची टीम आहे.