चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोर कार्यकर्त्यांवर कारवाई पण...

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोर कार्यकर्त्यांवर कारवाई पण...

चिंचवड (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कै. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे विठ्ठल ऊर्फ नाना काटे रिंगणात आहे. मात्र शिवसेनेचे येथील नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. त्यांना साथ देणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी काल करण्यात आली. पण, कलाटेंवर कारवाई करण्याचे धाडस न दाखविण्यात आल्याने ही कारवाई चर्चेचा विषय ठरला आहे.

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी ही कारवाई केली आहे. त्यांनी चिंचवड निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षाचे चिंचवड विधानसभा महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवी घटकर यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, या कारवाईला कारणीभूत ठरलेल्या कलाटेंवर ती न झाल्याबद्दल शिवसेनेतूनच आश्चर्य व्य़क्त करण्यात येत आहे.

त्यांना या बंडखोरीत साथ देणारे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षाच्या चार माजी नगरसेवकांवरही कारवाई न झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे बंडखोरांवरील कारवाई हा एक निव्वळ फार्स असल्याचे दिसून येत आहे.

हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांत चिंचवड मतदारसंघाबाहेरील पिंपरीसह शहराच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने कलाटेंच्या बंडाला चिंचवडच नाही, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातूनच साथ मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून ते लढले. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तरीही त्यांच्याविरुद्ध त्यावेळी काहीच कारवाई झाली नव्हती. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर सदस्य म्हणून अश्विनी चिंचवडे या नगरसेविकेची नियुक्ती करण्याचा पक्षादेश डावलून त्यांनी तेथे स्वत:ची वर्णी लावून घेतली. त्यानंतरही पक्षाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग केल्याचा बडगा उगारला नव्हता. आता, तर पक्षच नाही, तर आघाडीविरुद्ध बंड करीत ते पोटनिवडणुकीत अपक्ष उतरूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने शिवसेनेच्या एका नेत्याने संताप व्यक्त केला आहे.