कर्नाटक कामगिरीचं बक्षीस! कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदेंना मोठी जबाबदारी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
कर्नाटक , (प्रबोधन न्यूज ) - आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे भाजपने पक्ष संघटनेत बदल करण्याचा धडाका लावला असताना कॉंग्रेस पक्षाकडूनही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या (Karnataka Assembly Election) निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. त्या मतदारसंघातील विधानसभेत काँग्रेसला (Congress) प्रचंड यश मिळाले होते.
या कामगिरीनंतर पक्षाने प्रणिती शिंदे (Pranithi Shinde) यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना पुणे आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपावली आहे. त्यांची या दोन मतदारसंघासाठी मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ राहिला आहे. तर मावळ हा मित्रपक्ष राष्ट्रवादीचा मतदार संघ आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने प्रणिती शिंदे यांच्यावर सोपावली आहे.
भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू होणार...
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता भारत जोडो यात्रा २ लवकरच सुरू होणार असल्याचे कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.