किरीट सोमय्यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला - संजय राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

किरीट सोमय्यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला - संजय राऊत

मुंबई, दि. ६ एप्रिल - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. 1971 च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेवर युद्धाचे स्मारक बनवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्यांकडून तब्बल 58 कोटींचा निधी गोळा केला. मात्र, हा निधी नंतर त्यांनी राज्य सरकारकडे सोपवलाच नाही. स्वत:च्या निवडणुकीसाठीच त्यांनी हा पैसा वापरला. यातील मोठी रक्कम त्यांनी मुलाच्या कंपनीत टाकली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

1971 च्या भारत-पाक युद्धात आयएनस विक्रांत या युद्धनौकेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, नंतर ती युद्धनौका मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर लावण्यात आली होती. ही युद्धनौका भंगारात जाण्याची स्थिती निर्माण झालेली असताना तिला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी दिल्लीत धाव घेतली होती. देशाची अस्मिता असलेल्या या युद्धनौकेवर युद्धाचे एक चांगले स्मारक बनावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, केंद्र सरकारने याची दखल न घेतल्याने 2013 च्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच याप्रश्नी पुढाकार घेत मी 200 कोटी रूपये जमा करून दाखवतो, अशी डरकाळी फोडत निधी जमवण्यास सुरूवात केली होती, असे संजय राऊत यांनी सांगितले.

किरिट सोमय्या यांनी भाजपच्या झेंड्याखाली मुंबई ते दिल्ली आणि कन्याकुमारीपर्यंत लोकांकडून निधी गोळा केला. त्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली नौदलाचे निवृत्त अधिकारी व अनेक कॉर्पोरेटकडूनही मोठा निधी जमा केला. किरीट सोमय्यांनी हे पैसे राजभवनात जमा करू, असे सांगितले होते. मात्र राजभवनाकडे त्यांनी हे पैसे जमा केलेच नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. आपल्याला राजभवनाकडूनच ही माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून राजभवनाकडून यासंदर्भात आलेली कागदपत्रेही दाखवली. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने राजभवनाला 2012 ते 2015 या काळात किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी काही निधी जमा केला का, अशी विचारणा केली होती. त्यावर आपल्याकडे असा कोणताही निधी जमा झाला नाही, असे उत्तर राजभवनाने दिल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजभवनातून आलेले उत्तरही पत्रकारांना दाखवले.