हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ का ठरले जगातील सर्वात सुंदर विमानतळ ?

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ का ठरले जगातील सर्वात सुंदर विमानतळ ?
नवी दिल्ली  -

जगात अनेक विमानतळे आहेत जिथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे जातात. पण तुम्ही कधी कतारची राजधानी दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आहे का? तुम्ही कधी या विमानतळावर गेला आहात का? आणि तुम्ही गेला असाल तर तुम्ही या सुंदर विमानतळाला आवर्जून भेट द्यायलाच हवे. चला तर, या आलिशान विमानतळाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

गी विमानतळाला मागे टाकले 
नुकतेच हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी सिंगापूरचे चांगी विमानतळ या यादीत सर्वात वरच्या स्थानावर होते. मात्र, वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स अंतर्गत स्कायट्रॅक्सच्या वार्षिक रँकिंगमध्ये हमाद विमानतळ प्रथम क्रमांकावर आले.  तर सिंगापूरचे चांगी विमानतळ तिसऱ्या स्थानावर गेले आहे.

मोठी गुंतवणूक केली
मीडिया रिपोर्टनुसार,  हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला या या सर्वोच्चस्थानी नेण्यामागे  कतार एअरवेज आहे. येथील सरकारने राष्ट्रीय वाहक आणि विमानतळ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून ते आज पहिल्या स्थानावर आहे.

विनामूल्य शहर दर्शन 
बऱ्याच गोष्टींमुळे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ अतिशय खास आणि वेगळे बनते. उदाहरणार्थ, कतार एअरवेजचे प्रवासी ज्यांना हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कनेक्टिंग फ्लाइट घ्यावे लागते, अशा लोकांना इथे शहरात मोफत फिरवले जाते. ही सेवा येथून प्रवास करणाऱ्या लोकांना खूप आवडते.

विविध सुविधा 
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध प्रकारच्या इतर सुविधाही पुरविल्या जातात. उदाहरणार्थ, आलिशान निवास, स्वादिष्ट जेवण आणि व्हीआयपी हस्तांतरण सेवा देखील येथे प्रदान केली जाते. याच सेवेमुळे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला नंबर वन बनवण्यास मदत झाली आहे.

अतिशय शांत आणि स्वच्छ जागा
या विमानतळाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे दरवाजे अतिशय भव्य पद्धतीने केले गेले आहेत. इथे खूप शांतता आहे. फारसा आवाज आणि गोंगाट दिसत नाही. इस्लामच्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी एक स्वतंत्र जागा आहे, जिथे कोणत्याही प्रकारचा आवाज नाही. इथे कोणतीही विशेष घोषणा करताना आवाजाची खास काळजी घेण्यात येते. हे इतके शांत आहे की येथे सुई पडल्याचा आवाजही तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येतो.