ई चार्जिंग स्टेशन जवळपास नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार चालकांना मन:स्ताप
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 31 मार्च – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरण पूरक ई चार चाकी वाहने अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावर घेतल्या आहेत. मात्र या गाड्यांना चार्जिंग करण्यासाठी ई चार्जिंग स्टेशन्स जवळपास नसल्याने कार चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. चार्जिंगसाठी तब्बल 35 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याचे समोर आलं आहे.
महापालिकेने अधिकाऱ्यांसाठी ई मोटारी घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात 36 ई मोटारी भाडेतत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली असून, पैकी 8 मोटारी महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या मोटारी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांचा वापरही सुरू झाला आहे. मात्र या मोटारींसाठी चार्जिंग सुविधा जवळपास उपलब्ध नसल्याने चालकाला भोसरी येथील एमआयडीसीतील खासगी चार्जिंग स्टेशनवर जावे लागते. त्यामुळे येण्या-जाण्यातच सुमारे 35 किलो मीटरचा प्रवास करावा लागतो.
अधिकाऱ्यांना घरी सोडल्यानंतर वाहन चार्जिंगसाठी भोसरीला जाण्याचे कंटाळवाणे काम चालकाला करावे लागते. शिवाय तेथेही रांगेत गाडी उभी केल्यानंतर 1 तासानंतर नंबर लागतो. त्यामुळे वेळ व मन:स्ताप सहन करावा लागतो. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ते म्हणाले की, मोटारी भाडेतत्वावर घेण्यात आल्या असून, त्या चार्जिंगची व्यवस्था त्या कंपनीनेच करणे बंधनकारक आहे. ज्या वेळी महापालिका स्वतःच्या मालकीच्या ई वाहने खरेदी करेल त्या वेळी चार्जिंग स्टेशनचा विचार करण्यात येईल.
चार्जिंग स्टेशनची पुरेशी व्यवस्था नसल्याने आजही नागरिक ई मोटारी व दुचाकी घेण्याचे टाळत आहेत. एकीकडे केंद्र सरकार ई वाहने घेण्याचा आग्रह धरत आहे, वाहने खरेदी करताना आर्थिक सवलतही देण्यात येत आहे, मात्र चार्जिंग स्टेशनकडील दुर्लक्षामुळे केंद्राच्या या योजनेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. पीएमपीएमएल कडे सध्या 250 हून अधिक ई बसेसचा ताफा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या ई बसेसचे लोकार्पण 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झाले. परंतु आजही चार्जिंगची व्यवस्था नसल्याने 100 हून अधिक नव्या कोऱ्या ई बसेस धूळखात उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचाही ओढा ई वाहने खरेदी करण्याकडे आहे. परंतु ई चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेमुळे नागरिकही वाहने खरेदी करण्यास बिचकत आहेत. त्यामुळे अगोदर देशभर ई चार्जिंग स्टेशन्स उभारा नंतर ई वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन द्या असे नागरिकांचे म्हणणे आहे.