शाळेत घुसून 11 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्यास अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 25 मार्च – पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत घुसून एका 11 वर्षांच्या मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. मंगेश तुकाराम पदुमले (वय 36, रा. गुंजाळवाडी, पांडवनगर) असे या नराधमाचे नाव आहे. पिडीत मुलीने वर्णन केल्यानुसार आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पीडित मुलगी सकाळी 11 वाजता शाळेत गेली होती. त्याच्या अगोदरच हा नराधम शाळेत गेला होता. त्याने या मुलीला जिन्यातच अडवले व तिला म्हणाला की, मी तुझ्या वडिलांना ओळखतो. असे म्हणून त्याने मोबाईवर तिच्या वडिलांशी बोलण्याचे नाटक केले. त्या वेळी आणखी तिथे 3-4 मुली उपस्थित होत्या. मात्र सदर व्यक्तीची मुलीशी ओळख असल्याचे समजून त्या तिथून निघून गेल्या. नंतर आरोपीने मुलीला बोलत बोलत दुसऱ्या मजल्यावर नेले व तेथील बाथरूममध्ये तिला जबरदस्तीने घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.
घटनेनंतर त्याने मुलीला हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. नंतर पीडित मुलीने आपल्या मैत्रणीला घडलेला प्रकार सांगितला. मैत्रिणीने तातडीने ही माहिती आपल्या शिक्षिकेला दिला. शिक्षिकेनेही तातडीने पीडित मुलीच्या आईवडिलांना व पोलिसांना याची माहिती दिली.
पीडित मुलगी व इतर मुलींनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी या नराधमाचे रेखाचित्र तयार केले. त्याच वेळी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली. त्यात एके ठिकाणी हा नराधम दिसून आला. त्याचा शोध घेतला असता आरोपी केवळ एक दिवसासाठी शाळेच्या शेजारील शोरूममध्ये कामास होता अशी माहिती मिळाली. त्याचा आधार घेऊन गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाला तो जनवाडी येथील एका दारूच्या गुत्यामध्ये असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने तेथे जाऊन मंगेश पदुमले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.