ओपन जीमवर व्यायाम करायला गेला आणि तरुणाने जीव गमावला (व्हिडिओ)

रुग्णालय म्हणते विजेचा शॉक लागून मृत्यू, तर महा वितरण म्हणते आमचा काही संबंध नाही. पोलीस म्हणतात फॉरेन्सिक अहवाल आल्यावर पाहू. तरुणाचे कुटुंबीय हवालदिल.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ओपन जीमवर व्यायाम करायला गेला आणि तरुणाने जीव गमावला (व्हिडिओ)

पुणे - महावितरण आणि महानगरपालिकेच्या हलगर्जीपामुळे कोथरूड येथील भुसारी कॉलनीत एका निष्पाप तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. मात्र या दोन्ही सरकारी संस्था मृत तरुणाला न्याय देण्यास नकार देत आहे. त्याविरोधात या तरुणाच्या कुटुंबाचा मनावर दगड ठेवून लढा सुरू आहे.

अमोल शंकर नाकते (वय २४, रा. भूगाव) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळातील हा सदस्य हा त्याच्या मित्रांसह घटनास्थळी आला होता. भ्रमणध्वनी आल्याने तेथेच उभारलेल्या व्यायामाच्या उपकरणावर तो बसला होता. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागून तो जागीच कोसळला. यात त्याच्या पायाला, हाताला आणि चेहऱ्यावर काही ठिकाणी जखम होऊन तो भाग काळा निळा पडला. मित्रांनी त्वरित त्याला सह्याद्री रुग्णालयात हलवले. तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी विजेचा धक्का बसल्याने हा मृत्यू ओढावला असावा अशी शक्यता व्यक्त केली व ही बाब पोलिसांच्या ही निदर्शनास आणून दिली.

अमोलचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले असून त्याचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. यानुसार, मृत्यूचे कारण हे विजेचा जोरदार धक्का लागून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महावितरणचे अधिकारी मात्र विजेचा धक्का न लागल्याचे कारण देऊन टोलवाटोलवी करीत आहेत. जमिनी खालून जाणाऱ्या वीज वाहिन्या सरकारी नियमानुसार किमान तीन फूट खालून जाणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र घटनास्थळी 14 ते 24 इंच अंतरावरून वीज वाहिन्या टाकल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच वीज वाहिन्या नियमबाह्य पद्धतीने टाकल्या गेल्या आहेत. तसेच घटना स्थळाजवळ मोठा डीपी बॉक्सही आहे. शिवाय नुकताच पाऊस पडून गेला होता. त्याचे पाणी जमिनीत मुरले होते.

ज्या उपकरणावर हा अपघात घडला ते उपकरण याच नियमबाह्य पद्धतीने बसवलेल्या उच्च दाबाच्या विधुत्त वाहीनीवर बसवण्यात आले आहे. ही घटना दिनांक २० मार्च रोजी सायंकाळी ७:४० दरम्यान घडली. मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी बाजूच्या सोसायटीच्या छतावरून त्याच ठिकाणी पडत होते व यामुळे  तेथील जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला.

या अपघाता नंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही जिम मुळात पदपथावर होणार होती का? ती मैदानात का नेली? ती उभारताना सुरक्षेची काळजी का घेतली गेली नाही? तसेच महावितरणाच्या केबल कायद्याने बांधील नियमापेक्षा वरच्या भागात उच्च दाबाच्या वाहिण्या का टाकल्या गेल्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मृताचा भाऊ प्रशांत नाकते, कुटुंबीय व संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत.

संबंधित सरकारी खात्यातील बेजबाबदार व अकार्यक्षम अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मृत अमोलच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होतं आहे.

https://www.youtube.com/watch?v=YV6a2tGy0Sk