भाजपाचे जहाज बुडू लागल्याने ‘एकनाथा’चे हवेत बालिश ‘बार’

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपाचे जहाज बुडू लागल्याने ‘एकनाथा’चे हवेत बालिश ‘बार’

पाणीटंचाईवरून एकनाथ पवारांचा आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी महापौर योगेश बहल यांचा घणाघात
पिंपरी, दि. 23 मार्च - पिंपरी-चिंचवड शहराला चोवीस तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षांत दिवसातून दोन वेळादेखील शहरवासियांना पाणीपुरवठा करता आला नाही. गेल्या पाच वर्षांत केवळ ठेकेदारी, निविदा, लाचखोरी आणि खंडणीखोरीमध्ये गुंतलेल्या भाजपाचे जहाज बुडू लागल्याने भाजपच्या माजी पक्षनेत्यांना आता सतत भयानक स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामध्ये शहरात सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्याचे खापर आपल्या माथी फुटू नये या भितीपोटी त्यांनी राष्ट्रवादीवर सुरू केलेले आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’च म्हणाव्या लागतील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी एकनाथ पवार यांना उत्तर दिले आहे.
भाजपला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आला असल्याचा अत्यंत बालिश आरोप भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला होता. त्यावर योगेश बहल यांनी प्रसिद्धीपत्रक काढून उत्तर दिले आहे. या पत्रात योगेश बहल यांनी म्हटले आहे की, गतवेळच्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने शहरवासियांना २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुर्वी दिवसातून दोनवेळा होणारा पाणीपुरवठा यांच्या काळात दिवसाआड सुरू झाला. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली शेकडो कोटींची टेंडर काढण्यात आली त्यातून कोट्यवधींचा मलिदा लाटण्यात आला मात्र भ्रष्ट कारभारामुळे ही कामेच पूर्ण न झाल्यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
एकनाथ पवार हे पक्षनेते असताना वारंवार दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या व चोवीस तास पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेत बसून सांगत होते. मात्र त्यांनी केवळ निविदा प्रक्रियेतून स्वत:चे घर भरण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पापामुळे व भ्रष्ट कारभारामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून, कमी दाबाने पुरवठा होत आहे. फक्त पाणीपुरवठाच नव्हे तर 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीतील एकही आश्वासन एकनाथ पवार आणि त्यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांना पुर्ण करता आलेले नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे जहाज बुडणार हे निश्चित झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
महापालिकेची मुदत संपल्याने १४ मार्चपासून महापालिकेत प्रशासकांचा कारभार सुरु झाला आहे. दरम्यान मागील पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्यात केलेला ढिसाळ कारभाराचे खापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लादण्याचा एकनाथ पवार यांचा खटाटोप अत्यंत हास्यास्पद आहे. मांजर कितीही डोळे मिटून दुध पीत असले तरी सगळं जग तिला पाहत असतं, ही म्हण एकनाथ पवार विसरलेत का? असा खोचक सवालही योगेश बहल यांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ पवारांनी पाच वर्षे सत्तेत असताना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काय प्रयत्न केले? भाजपच्या ‘सत्तेवर आल्यानंतर २४ तास पाणी देण्या’च्या आश्वासनाचे काय झाले? आंद्रा आणि भामा-आसखेड धऱणातून ते पाणी का आणू शकले नाहीत? त्यांच्या सत्ताकाळात शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न का निर्माण झाला? या प्रश्नाचे उत्तर एकनाथ पवारांनी जाहिरपणे द्यावीत, असे आव्हानही बहल यांनी दिले आहे.
धरणात मुबलक पाणीसाठा असतानासुद्धा भाजपमुळे नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली वणवण हे भाजपचे मोठे पाप आहे. पाण्यासाठी शहरातील माता-भगिनींना आंदोलन करण्याची वेळ केवळ भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे आलेली आहे. या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याआधी एकनाथ पवार यांनी एकदा स्वत:च्या पक्षाचे काम तपासून पहावे. पाच वर्षात जनतेचे हाल केले, विकासकामांकडे दुर्लक्ष करुन केवळ स्वत:ची तुंबडी भरली. प्रभागातील समस्यांऐवजी कोण ठेकेदार किती टक्के देईल, यासाठीच महापालिकेची पायरी चढणाऱ्या स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप पदाधिकाऱ्यांना शहरातील जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असा हल्लाबोलही योगेश बहल यांनी केला आहे.