स्वरलोकीचा आत्मा स्वरलोकी परतला ! लतादीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्वरलोकीचा आत्मा स्वरलोकी परतला ! लतादीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पिंपरी -
स्वरलोकीच्या त्या आत्म्याने भूतलावर 'लता मंगेशकर' नावाचा देह धारण केला... अवघ्या भारतवर्षावर सात दशके आपल्या स्वर्गीय सुरांचा 'आनंदघन' बरसवून आज तो आत्मा स्वरलोकी परतला...!  पहाटेच्या भूपाळीपासून ते निजेच्या अंगाईपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या कानात मधाळ गुंजन करणारा एक स्वर्गीय आवाज अखेर आज विरून गेला ! दोन डोळ्यांत मावणार नाही आणि दोन कानांतही साठविता येणार नाही, इतका विशाल सांगितिक पट रसिकांना भेट देऊन स्वरांचा हा पारिजात कायमचा अबोल झाला ...! 
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आज (रविवार दि. ६ फेब्रुवारी) ९२ वर्षी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान, जावेद अख्तर या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.