फडणवीसांनी दुसरा पेन ड्राईव्ह सभागृहात अध्यक्षांकडे सोपविला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

फडणवीसांनी दुसरा पेन ड्राईव्ह सभागृहात अध्यक्षांकडे सोपविला

मुंबई, दि. १४ मार्च - विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणखी एक व्हिडिओ बॉम्ब टाकला असून, आज त्यांनी दुसरा पेन ड्राइव्ह विधानसभेत सादर करत खळबळ उडवून दिली. हा दुसरा पेन ड्राइव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात बॉम्ब फोडणार होते, काय झाले? बॉम्ब कुठे आहे, असा प्रश्न सामाजिक न्‍यायमंत्री धनंजय मुंडे विचारत होते. धनंजय मुंडे यांनी हातवारे करून विचारलेल्या या प्रश्नामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. सकाळी अधिवेशन सुरू होताच जयंत पाटील बोलायला उभे राहिले होते. मात्र त्‍यांच्‍यापेक्षा जास्‍त चर्चा ही धनंजय मुंडे यांची होताना दिसून येत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारा व्हिडिओ बॉम्ब विधानसभेत सादर केला होता. त्‍यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अजून बरेच बॉम्‍ब बाकी आहेत, अशी घोषणा केली होती. आणि याचाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत हातवारे करत, भाजप नेत्‍यांना बॉम्‍ब कुठे आहे अशी विचारणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आरोप करताना म्हटलं की, मी पेन ड्राईव्ह देतो. आता या पेनड्राईव्ह मध्ये दोन पात्र आहेत. एक मोहम्मद अरशद खान आणि दुसरं डॉ. मुदसैर लांबे. ह्यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलंय. लांबेवर यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. मग त्यांनी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. या महिलेच्या पतीने घटस्फोट दिला होता. डॉ लांबे ह्यांनी या महिलेच्या पती विरोधात चोरीची तक्रार केली अन् तो तुरुंगात गेला. डॉ लांबे आणि मोहम्मद अरशद खान यांच्यात झालेल्या संवादात वक्फ बोर्डामध्ये पैसे कसे कमवायचे अशी चर्चा सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.