पाच वर्षांच्या मुलीच्या यू ट्यूबवर ५ लाख कोटी चाहते; मोदीही आहेत फॅन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मिझोराम, दि. १५ - मिझोराममधील एक लहान मुलगी यूट्यूबची सुपरस्टार बनली आहे. अशी सुपरस्टार जिच्या आवाजाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील चाहते आहेत. तिचे नाव आहे हे एस्टर हनामतेचे. जिच्या वंदेमातरम गाण्याला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर रिट्वीट केले होते. या गाण्याचा आता नवीन विक्रम बनला आहे. यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत 1.3 कोटी लोकांनी पाहिलं आहे.
एस्टर हनामते ही अवघ्या पाच वर्षांची आहे. मात्र यूट्यूबवर तिच्या ऑफिशियल पेजला 5.62 लाख लोकांनी फॉलो केले आहे. एस्टरने यूट्यूबवर अनेक गाणे गायली आहेत. यामधील वंदे मातरम गाण्यामुळं तिला प्रसिद्ध मिळाली आहे. हे गाणे आतापर्यंत 1.3 कोटी लोकांनी पाहिले आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार एआर रहमानच्या ओरिजिनल गाण्याचा हा रीमेक 2020 मध्ये यूट्यूबवर रिलीज करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एस्टर स्कूल ग्राउंडच्या मधोमध आपल्या हातात तिरंगा घेऊन उभी राहत हे गाणे गाताना दिसत आहे. गाण्यामध्ये इतर मुले देखील तिच्यासोबत तिरंगा फडकावत असताना दिसत आहेत.
ही व्हिडिओ क्लिप 7.93 लाख लोकांनी पाहिली आहे. तर 30,000 पेक्षा जास्त लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. एवढेच नाही तर त्या ट्विटला आतापर्यंत 6000 वेळा रिट्वीट करत इतरांसोबत शेअर करण्यात आले आहे.