पिंपरी-चिंचवड शहर भाजपला खिंडार, रवी लांडगे, संजय नेवाळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवड शहर भाजपला खिंडार, रवी लांडगे, संजय नेवाळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी)-  पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचा पाय आणखी खोलात गेला. या पक्षाच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला जोरदार धक्का देत आल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला आहे. भाजपचे नगरसवेक रवी लांडगे आणि संजय नेवाळे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.


पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने आपल्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्ट कारभाराला तसेच दोन्ही आमदारांच्या हुकुमशाहीला वैतागून राजीनामाअस्त्र सुरू केले आहे. आतापर्यंत वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे आणि चंदा लोखंडे या नगरसेवकांनी भाजपला जय श्रीराम केले होते. त्यानंतर आज रवी लांडगे आणि संजय नेवाळे या दोन नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने भाजपला खिंडारच पडल्याचे मानले जात आहे.


दरम्यान, रवी लांडगे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. भाजपाकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आल्याने रवी लांडगे यांचा राजीनामा आरएसएसला सुद्धा धक्का देणारा ठरला आहे. तर संजय नेवाळे चिखली, जाधववाडी परिसरातील मोठे नेतृत्त्व मानले जाते. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाच्या किमान ८ ते १० जागांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  भाजपा सोडणारे बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत. लांडगे आणि नेवाळे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.