शौचालयाची टाकी साफ करताना गुदमरून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शौचालयाची टाकी साफ करताना गुदमरून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

लोणी-काळभोर, दि. 2 मार्च – लोणी स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना, टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिकंदर ऊर्फ दादा पोपट कसबे (वय 45, रा. पाण्याची टाकी, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), पद्माकर मारुती वाघमारे (वय 43, रा. पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय 26, रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर), रुपचंद ऊर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे (वय 45, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती) अशी मृत कर्मचारींची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेल मागे जय मल्हार कृपा नावाची इमारत आहे. या इमारतीची शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम तीन कर्मचारी करीत होते. साफसफाई सुरू असताना टाकीतील विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू झाला, तर चौथा त्यांना वाचविण्यासाठी आता उतरला असता त्याचाही मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेऊन चौघांचेही मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी अधिक तपास करीत आहेत.