राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबई, कोकण, कोल्हापूरमध्ये मुसळधार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबई, कोकण, कोल्हापूरमध्ये मुसळधार
राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबई, कोकण, कोल्हापूरमध्ये मुसळधार
राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबई, कोकण, कोल्हापूरमध्ये मुसळधार

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - जून महिन्यात ओढ दिल्यानंतर अखेर राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई, नागपूर, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत पावसाची संततधा' सुरू आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील काही भागांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचा वाढता जोर आणि नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईसह पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. सोमवारीच मुंबई, ठाण्यासहीत कोकणामधील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय.

मुंबईत सोमवारपासून पावसाचा जोर वाढला असून, अनेक सखल भागात पाणी साचू लागलं आहे. कुर्ला भागातही अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, कुर्ल्यातील नेहरू नगरातील एस. के.. पंतवाळवलकर इंग्लिश स्कूलमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर सुट्टी देण्यात आली.

मुंबईतील पूर्वद्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल मार्ग, एलबीएस मार्ग, एस व्ही मार्ग अशा महत्वाच्या मार्गांवरील वाहतूक मंदावली असून, अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

कोल्हापुरातील पंचगंगेची पाणीपातळी ९ फूटांनी वाढली

राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही धो धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पात्रातील पाण्याचा ओघ वाढला असून, कसबा बावडा, राजाराम बंधारा याठिकाणील रस्ते वाहतूक सोमवारी (४ जून) रात्रीपासून बंद करण्यात आलीये. मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल नऊ फूट इतकी वाढ झाली आहे.

कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सकाळपर्यंत राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. भोगावती आणि कासारी नदी दुथडी भरून वाहत आहे. बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून येथील धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक गावातच अडकले आहेत. पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी सोमवारी दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथून 2 मिनीबस व 8 कारमधून अंदाजे 80 पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी 5 वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील माणसीश्वर मंदिराजवळ भरपूर पाणी आले होते. हे पाणी मंदिरातून वाहत होते. पाण्याचा प्रवाह एवढा होता की मंदिरातून पाणी जाताना पाहायला मिळालं.

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तालुक्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. पहाटेपासून गुहागर मधील बहुतांश भागात पावसानं तुफान बॅटिंग सुरू केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहतायत. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास गुहागरमधील अनेक भागात नदीचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झालीय. समुद्राला मोठ्या प्रमाणात आलेल्या उधाणामुळे किनारपट्टीवर मोठी धूप झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही यलो अलर्ट देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे.