मला वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला – संभाजी राजे भोसले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 27 मे - संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले होते. तेव्हा आमची मिटिंगही झाली होती. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा आम्ही उद्याच उमेदवारी जाहीर करतो. मात्र, मी अपक्ष म्हणून लढणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही, हे मी त्यांना स्पष्ट केलं. त्यानंतर दोन दिवसांनी मला मुख्यमंत्र्यांनी फोन करुन वर्षावर येण्याचे आमंत्रण दिलं. आपण सविस्तर बैठक घेऊन चर्चा करु असं ते मला म्हणाले त्यामुळं मीसुद्धा मीसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो.
मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आम्ही तीन मुद्द्यांवर बोललो. ते म्हणाले आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचे नाही असं म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला. मात्र, तेव्हाही मी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्याउलट मी त्यांना दोन प्रस्ताव दिले. शिवसेनेची ही जागा असं ते म्हणतात. त्यामुळं मी त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा, असा प्रस्ताव मी त्यांना दिला. पण राजे ते शक्य होणार नाही, असं म्हणून त्यांनी त्यास नकार दिला.
मुख्यमंत्र्यांनी आणखी एक प्रस्ताव दिला. तो म्हणजे, महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनापुरस्कृत उमेदवार करायला आम्ही तयार आहोत. मात्र, तो प्रस्ताव मी मान्य केला नाही. त्यावर मी त्यांना दोन दिवसांचा कालावधी विचार करण्यासाठी दिला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या मंत्र्यांचा मला फोन आला. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला सांगितली आहे. तुम्हाला अपक्ष पुरस्कृत उमेदवारी द्यायचीये. त्यावर आमची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी आणि मी दिलेल्या सूचना मिळून ड्राफ्ट तयार झाला, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला भेटायला आहे. त्यात मंत्री होते, त्यांच्या जवळचे स्नेही होते, एक खासदार होते. त्यांच्या स्नेहींनी सागंतिलं की आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. पण मी नकार दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलेला ड्राफ्ट मी वाचला. त्यात एक शब्द होता. तो शब्द बदलल्यानंतर ड्राफ्ट फायनल झाला, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर मी कोल्हापूरला रवाना झालो. पण कोल्हापुरला जात असताना नवीन बातम्या दिसल्या. तर कोल्हापुरला गेल्यावर समजलं संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मी खासदारांना फोन केला हा काय प्रकार आहे?. पण तेही काही बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला. याचे वाइट वाटतंय, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
मला इतकं वाईट वाटतंय. मला मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मला दिलेला शब्द मोडला. असो, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी सज्ज झालोय. २००९ ची निवडणूक हरल्यानंतर मी राज्य पिंजून काढला."
"माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही. माझी स्पर्धा माझ्यासोबतच आहे. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी उभा राहणार आहे. माझ्या अर्जावर सह्या करणाऱ्या आमदारांचे मी आभार मानतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. केव्हाही हाक त्यांनी द्यावी, संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेसाठी हजर असेन," असं आश्वासन संभाजीराजेंनी दिलं.
"शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्ष प्रवेशाची. मी ती ऑफर घेऊ शकलो असतो, पण मी आधीच स्पष्ट केलं होतं. अनेक आमदारांचे फोन आहेत की, राजे कुठल्याही परिस्थिती निवडणूक लढवायचीच. पण, यात घोडेबाजार होणार याची कल्पना आहे. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी या निवडणुकीला सामोरा जाणार नाही. पण, ही माघार नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे," असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.