भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनने सुरू केली विशेष रेल्वे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनने सुरू केली विशेष रेल्वे

नवी दिल्ली, दि. 28 – शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांची उपासमार तर होत आहेच शिवाय बॉर्डरपर्यंत जाण्यासही त्यांना प्रचंड अडचणी येत आहेत. त्यांना युक्रेनमधून बाहेर पडता यावे म्हणून युक्रेनने विशेष रेल्वे सुरू केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी जिथे अडकून पडले आहेत तेथून बाहेर पडून रेल्वेद्वारे युक्रेनच्या सीमेपर्यंत पोहोचता येणार आहे. एकदा शेजारी देशात पोहोचले की भारतीय विमानाद्वारे त्यांना भारतात परत येता येईल.

युक्रेनमधील कीव्ह येथे अडकलेल्या सीजीसोबतच भारतीय विद्यार्थ्यांना आज सकाळी वृत्त मिळाले आहे की, युक्रेनच्या वेळेनुसार सकाळी 9 वाजता त्यांच्या सुटकेसाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना रेल्वे स्थानकावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. म्हणजेच भारताच्या वेळेनुसार रात्री 12.30 च्या सुमारास विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे आहे. यामुळेच विद्यार्थी बंकर सोडून वसतिगृहातून सामान बांधून रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले आहेत.

सध्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आता ट्रेन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि बंकर आणि मेट्रो सोडून ते सीमेवर पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की दोन ट्रेनमध्ये 700 विद्यार्थी येऊ शकतात आणि त्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ट्रेनमध्ये प्रवास करावा लागेल.