गहू, साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी येणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गहू, साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी येणार ?

नवी दिल्ली, दि. 26 मे - रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरूवात होऊन जवळपास ३ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु त्यांचे परिणाम आता संपूर्ण जगभरात होताना दिसत आहेत. जगात अन्न संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांत घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या खाद्य वस्तू आवश्यक साठा नसल्याने निर्यातीवर बंदी आणली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गहूनंतर साखर निर्यातीवर बंदी आणली होती. साखरेच्या किंमती कमी होऊन त्याचा पुरवठा देशात मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी मोदी सरकारने सर्व ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

पंतप्रधान कार्यलय घरगुती खाद्य वस्तूच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी मोठं पाऊल उचलत आहे. केंद्र सरकार ५ गरजेच्या वस्तू निर्यात करण्यावर रोख आणण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये गहू आणि साखरेच्या निर्यातीवर याआधीच बंदी आणली आहे. परंतु साखरेनंतर आता बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ निर्यात करण्यावर बंदी आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे.

तांदूळ निर्यातीत भारतापुढे चीन आहे. भारत जगातील तांदूळ निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने २०२१-२२ मध्ये १५० हून जास्त देशांना तांदूळ निर्यात केला आहे. यामध्ये भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीवर सर्वात जास्त परदेशी चलन कमाई केली. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे. दर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं लागेल यावर विचार विनिमय सुरू आहे. परंतु येत्या १ जूनपासून देशातील साखर निर्यातीवर बंदी येणार आहे. साखरेच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि देशातील साखर पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.