खासदार संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे; सर्व मागण्या मान्य

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खासदार संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे; सर्व मागण्या मान्य

मुंबई, दि. 28 - सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. राजेंनी उपोषण मागे घेतल्याने सरकारने व राज्यातील जनतेनेही निःश्वास टाकला आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन या मंत्र्यांनी संभाजीराजेंना दिले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर एका लहान मुलाच्या हातून फळाचा रस घेऊन संभाजीराजे यांनी आपण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी काही मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत, असे शिंदे म्हणाले. आता मागे काहीच ठेवायचे नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत आहेत, असेही मंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे आपले आमरण उपोषण मागे घेतले.