पुण्यात चालत्या बसला भीषण आग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात चालत्या बसला भीषण आग

सुदैवाने जीवित हानी नाही, मात्र अग्निशामक दलाचा एक  जवान जखमी


पुणे, दि. 27 - पुण्यातील चांदणी चौकामध्ये चालत्या बसला अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली आहे. आग विझवताना अग्निशामक दलाचा अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेत इतर कोणी जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील चांदणी चौकात चालत्या बसला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमच्या कोथरूड आणि पाषाण येथील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीवर नियंत्रण मिळवताना गजानन पाथ्रुडकर (वय 54) या अग्निशामक दलाच्या अधिकार्‍याच्या चेहर्‍याला आणि खांद्याला जखम झाली आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ  रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस असूनही ते कामावर रुजू झाले होते. 

बसने पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेमुळे वाहतूक विस्कळित झाली होती.