पिंपरी चिंचवडसाठी चार वर्षात चौथे आयुक्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी चिंचवडसाठी चार वर्षात चौथे आयुक्त

महापालिका निवडणुकांची तयारी?

"कृष्ण"कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न

संघटित गुन्हेगारीवर "अंकुश" कायम हवा 

#रोहित_आठवले 

पिंपरी चिंचवड शहरासाठी चार वर्षात चौथे पोलिस आयुक्त म्हणून #अंकुश_शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे आयुक्त #कृष्ण_प्रकाश यांची व्हीआयपी सिक्युरिटी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. नक्षल प्रभावित भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणारा आणि #प्रसिद्धीच्या_झोतापासून_दूर_राहिलेला_वास्तवातील_सिंघम अशी अंकुश शिंदे यांची राज्यात ओळख आहे. 

१५ ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलाचे विभाजन करून पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसरासाठी #स्वतंत्र_पोलिस_आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर शहराला नियुक्त करण्यात आलेल्या यापूर्वीच्या तीनही आयुक्तांना त्यांचा किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही. विविध कारणांनी तत्कालीन राज्य सरकारने मागील तीन आयुक्तांची बदली केली आहे. 

प्रथम आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आयुक्तालय सुरू करण्यासाठी जागा निवडण्यापासून त्याच्या उभारणीसाठी काम केले. त्यांच्यांनंतर आलेले संदीप बिष्णोई यांनी आयुक्तालय उभरणीतील राहिलेल्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. तर महाविकास आघाडी सरकारने #अतिरिक्त_पोलिस_महासंचालक दर्जाचे आयुक्त पद पदावतन करून विशेष #महानिरीक्षक पदाचे करून कृष्ण प्रकाश यांची १८ महिन्यांपूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये आयुक्त म्हणून नियुक्त केली. 

कृष्ण प्रकाश यांनी सर्वप्रथम पोलिस कर्मचारी भरती प्रक्रिया राबवत शहरातील कर्मचारी संख्या बळ वाढविण्यास शासन दरबारी खूप प्रयत्न केले. त्यांच्या काळात #शहरासाठी_पहिली_पोलिस_भरती झाली. आयुक्तालयाला वाहने मिळवून देणे असो वा विविध पथक सुरू करून संघटित गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यात आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. 

नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी #हैदराबाद ट्रेनिंग व्यतिरिक्त #लंडन येथील गुन्हेगारी आणि तेथील कार्यपद्धतीचा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय गरजेचे आहे याचे #विशेष_ट्रेनिंग घेतले आहे. या ट्रेनिंगचा फायदा #सोलापूर आणि अन्य ठिकाणी पोस्टिंग असताना कुणाच्या कशा मुसक्या आवळल्या पाहिजेत यासाठी शिंदे यांनी केला आहे. संघटित गुन्हेगारीवर चांगला "अंकुश" त्यांनी आत्ता पर्यंत ठेवला आहे. सोलापुरातील तत्कालीन #नगरसेवकांवर तसेच #व्हाईट_कॉलर_गुन्हेगारांवर त्यांनी केलेली कारवाई कायम चर्चेत राहिली आहे. मात्र, विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे हे त्यांच्या पूर्ण कार्यकाळात #प्रसिद्धीच्या_झोतापासून कायम दूर राहिल्याचे दिसते. 

रात्री-अपरात्री सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, चौकात बसून गप्पा मारणारे व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आयुक्त शिंदे यांनी कारवाई केली होती. तसेच पोलिसांच्या बेशिस्त वर्तनावर त्यांचे विशेष लक्ष असायचे. #उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्येही अशाच कारवाईची गरज आहे. राजकारण्यांना सुतासारखा सरळ करणारा #युनिट_कमांडर आणि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या योग्य तसेच कायदेशीर कामाच्या पाठीशी राहणारे आयुक्त अशी #अंकुश_शिंदे यांची ओळख पिंपरी चिंचवडमध्ये कायम राहण्याची गरज आहे. 

मुरब्बी आणि #ग्राउंड_लेव्हलची_माहिती_असणारे_आयुक्त शिंदे लवकरच पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत असून, माणसाची पारख असलेले हे नवे अधिकारी पूर्वीची चूक करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान, आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मागील १८ महिन्यात अनेक #लोकहितवादी निर्णय राबवित अनेक उपक्रम घेतले. कृष्णकृत्यांना आळा घालण्याचा त्यांचा प्रयत्न #वाखाणण्याजोगा होता. ते कधीही कोणत्याही #राजकीय_दबावाला बळी पडले नाहीत. परंतु ट्रॅफिक प्रॉब्लेम सोडविण्यात त्यांना म्हणावे तेवढं यश आले नाही. 

स्ट्रीट क्राईम जेवढा होता तो आजही चार वर्षांनंतर कायम आहे. #राजकीय वजन वापरून शहरात आलेल्या अधिकाऱ्यांना बाजूला सारत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना विविध पथकांचे प्रमुख पद दिले. या सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. 

गुन्हेगारी विश्वात अडकलेल्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रयत्न केले होते. #चाकण_एमआयडीसी आणि शहरातील एकंदरीत एमआयडीसी मधील गुन्हेगारीत चालणारी माथाडी राज उखडून टाकण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना विशेष काम करावे लागणार आहे. 

आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरात #अवैध_धंदे बोकाळू दिले नाहीत. ते पूर्ण बंद राहतील असे त्यांचे प्रयत्न होते. सामाजिक शांतता राखायची असेल तर हे अवैध प्रकार बंद राहिले पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न होता. पण हे सगळ बंद झाले नाही हे त्यांच्या विशेष पथकाच्या मागील कारवाई वरून दिसून येते. कारण या पथकाची कारवाई सातत्याने शहरात सुरू होती. यावरून अवैध प्रकार १००% बंद नव्हते हे दिसून येते. 

#असंगाशी_संग टाळले तर नवनियुक्त आयुक्त त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील यात शंका नाही. आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनेकांनी मागील आयुक्त कसे_चांगले किंवा कसे #बिल्डरधार्जीण आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न आत्ता पर्यंत केला आहे. परंतु, मीडियाने चितारलेले चित्र खरे की; #इमेज_बिल्डिंग आहे हे ओळखण्यात नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे तरबेज असल्याचे त्यांच्या आत्ता पर्यंतच्या कामगिरीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे ते #आभासी_विश्वाला दूर ठेवतील यात शंका नाही.